गतवर्षी भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत आंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा रहकीम कोर्नवॉल त्याच्या कामगिरीपेक्षा 140 किलो वजनामुळे चर्चेत राहिला. भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्यानं तीन फलंदाजांना बाद केले. यामध्ये चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी यांचा समावेश होता. याच रहकीमनं गतवर्षी कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये दे दणादण फटकेबाजी केली होती. या अगडबंब खेळाडूंनं केलेल्या 'वजन'दार कामगिरीच्या जोरावर सेंट ल्युसीआ झौक्स संघाला विजय मिळवून दिला होता. पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या सीपीएलच्या नव्या हंगामापूर्वी कोर्नवॉलची ही विक्रमी फटकेबाजी पाहायलाच हवी...
कॅरेबियन लीगचा थरार पुढील आठवड्यापासून सुरू होणार; लीगचं वेळापत्रक एका क्लिकवर!
2019च्य मोसमात प्रथम फलंदाजी करताना जमैका थलाव्हास संघाने 5 बाद 170 धावा केल्या. झौक्स संघाने 16.4 षटकांत 5 फलंदाजांच्या मोबदल्यात हे लक्ष्य पार केले. आंद्रे फ्लेचर आणि रहकिम कोर्नवॉल यांच्या फटकेबाजीनं संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात फ्लेचर आणि कोर्नवॉल यांनी पहिल्या विकेटसाठी 8.4 षटकांत 111 धावांची भागीदारी केली. शॅमेर स्पिंजरने नवव्या षटकात कोर्नवॉलला बाद केले, परंतु तोपर्यंत झौक्सचा विजय निश्चित झाला होता. कोर्नवॉलने 19 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्याने या सामन्यात 30 चेंडूंत 191 च्या स्ट्राईक रेटनं 75 धावा चोपल्या. त्यात 4 चौकार व 8 षटकारांचा समावेश होता. फ्लेचरने 36 चेंडूंत 2 चौकार व 3 षटकारांसह नाबाद 47 धावा केल्या होत्या
विमान पकडण्यासाठी पोहोचला नाही वेळेत अन् आता ट्वेंटी-20 लीगमधून घ्यावी लागली माघार!
ट्वेंटी-20 लीगसाठी 162 खेळाडू अन् अधिकाऱ्यांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट आला समोर; सर्व झाले क्वारंटाईन
Web Title: Get ready for CPL 2020: Did you know that Rahkeem Cornwall had the best batting SR at CPL 2019,Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.