जगभरात कोरोना रुग्णांचा आकडा एक कोटीच्या वर गेला आहे. देशातील कोरोना रुग्ण 7 लाखांहून अधिक झाले असून सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांमध्ये भारत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. कोरोना व्हायरसमुळे क्रीडा स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे खेळाडूंना आपापल्या घरीच रहावे लागत आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला त्याचा 39 वा वाढदिवस कुटुंबीयांसोबत साजरा करावा लागणार आहे. कोरोना व्हायरसमुळे त्याला हा वाढदिवस साधेपणानं साजरा करावा लागणार आहे. पत्नी साक्षीनं त्यांचा बर्थ डे प्लानही सांगितला आहे. मुंबई पोलिसांनी कॅप्टन कूल धोनीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं लोकांना सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व समजावून सांगितले आहे.
महेंद्रसिंग धोनीला पत्नी साक्षीकडून रोमँटिक शुभेच्छा; सांगितला बर्थ डे प्लान
धोनीनं 90 कसोटी सामन्यांत 38.09 च्या सरासरीनं 6 शतकं व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. 350 वन डे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ही 50.57 इतकी आहे. त्याच्या 10773 धावांत 10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 98 सामन्यांत 1617 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर 256 झेल व 38 स्टम्पिंग, वन डेत 321 झेल व 123 स्टम्पिंग आणि ट्वेंटी-20त 57 झेल व 34 स्टम्पिंग आहेत. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप, वन डे वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या आयसीसीच्या तीनही स्पर्धा जिंकणारा धोनी हा जगातील एकमेव कर्णधार आहे. याशिवाय त्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत.
मुंबई पोलिसांनीही काव्यात्मक शुभेच्छा दिल्या.
"मैदानावर सामना रंगूदे,
होउदे पाऊस धावांचा...
"धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा"
करुया खात्मा कोरोनाचा...
"सुरक्षित अंतराचे पालन करुन सुरक्षित आयुष्याचा खेळ खेळूया..."
त्याशिवाय त्यांनी MSD चा वेगळा अर्थ सर्वांना समजावून सांगितला. Maintain social distancing असा अर्थ त्यांनी सांगितला आहे.
माही, तो 'टफ कॉल' घ्यायची हीच ती वेळ, कारण...
काश्मीर खोऱ्यात पहारा देणाऱ्या महेंद्रसिंग धोनीचे Unseen Photo व्हायरल!
महेंद्रसिंग धोनीचे 'हे' दहा विक्रम मोडणे अशक्य!
समुद्रात उभं असलेलं लाईटहाऊस पाहिलं की कायम तुझी आठवण येते; केदार जाधवंच भावनिक पत्र
महेंद्रसिंग धोनीला DJ Bravoचं अनोखं गिफ्ट; पाहा भन्नाट गाणं
Web Title: Happy Birthday Dhoni: Mumbai Police Poetic wishes to MS Dhoni
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.