"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!

Cheteshwar Pujara Team India, IND vs AUS 1st Test: मालिकेतील पहिली कसोटी २२ नोव्हेंबरपासून पर्थमध्ये खेळवली जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 08:54 PM2024-11-20T20:54:11+5:302024-11-20T20:55:38+5:30

whatsapp join usJoin us
Happy that Cheteshwar Pujara is not around this time in Australia said Josh Hazlewood ahead of IND vs AUS 1st Test | "यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!

"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Cheteshwar Pujara Team India, IND vs AUS 1st Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (WTC Final) अंतिम सामन्याआधी भारताची शेवटची मालिका ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघ यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना २२ नोव्हेंबरपासून (शुक्रवार) पर्थमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यातून रोहित शर्मा आधीच बाहेर झाला आहे. तसेच इतरही काही खेळाडू दुखापतींनी ग्रस्त आहेत. अशा परिस्थितीत भारतीय चाहतेच नव्हे, तर ऑस्ट्रेलियन गोलंदाजही टीम इंडियाची 'द वॉल' चेतेश्वर पुजाराबाबत बोलू लागले आहेत. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड याने पुजारा संघात नसल्याबाबत आनंद व्यक्त करत आहेत.

चेतेश्वर पुजाराबद्दल काय म्हणाला जोश हेजलवूड?

"यावेळी चेतेश्वर पुजारा भारतीय संघात नसेल याचा मला आनंद आहे. पुजारा हा असा फलंदाज आहे जो गोलंदाजांना घाम फुटेपर्यंत थकवतो आणि दीर्घकाळ पिचवर टिकून राहतो. पुजारा खूप वेळ क्रीजवर खेळतो. त्याची विकेट घेण्यासाठी गोलंदाजांना खूप परिश्रम करावे लागतात. ऑस्ट्रेलियाच्या गेल्या वेळच्या दौऱ्यात चेतेश्वर पुजाराने अप्रतिम कामगिरी केली होती," असे जोश हेजलवूड म्हणाला.

"प्रत्येक संघात कायम दमदार खेळाडू नव्याने येत असतात. भारतीय संघात कमालीची स्पर्धा असते. त्यामुळे टीम इंडियात समावेश झालेल्या प्रत्येक खेळाडूला चांगली कामगिरी करावीच लागते. प्रत्येक खेळाडूवर खूप दडपण असते. भारतात अनेक उदयोन्मुख खेळाडू आहेत. मूळ संघातील एखादा खेळाडू फ्लॉप ठरला तर त्याच्या जागी दुसरा नवा खेळाडू तयार असतो. त्यामुळे भारतीय संघातील अंतिम ११ खेळाडू हे अनपेक्षित असू शकतात याची आम्हाला पूर्ण कल्पना असते. सध्या त्यांचा संघ पाहून मी असं म्हणेन की त्यांचे सगळेच खेळाडू मोठे आहेत, त्यामुळे त्यांना कमी लेखण्याची चूक ऑस्ट्रेलिया कधीच करणार नाही," असे मोठे विधानही हेजलवूडने केले.

Web Title: Happy that Cheteshwar Pujara is not around this time in Australia said Josh Hazlewood ahead of IND vs AUS 1st Test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.