Video : ऐ खुदा, तुने तो हमे हैरान कर दिया!; Harbhajan Singhची कविता व्हायरल

जगभरातील कोरोना रुग्णांचा आकडा हा 38 लाख 21,494 इतका झाला आहे. त्यापैकी 13 लाख, 03,692 रुग्ण बरे झाले असून 2 लाख 65,115 जणांचा प्राण गमवावे लागले आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 12:55 PM2020-05-07T12:55:15+5:302020-05-07T12:55:48+5:30

whatsapp join usJoin us
Harbhajan Singh shows his poetic side amid lockdown svg | Video : ऐ खुदा, तुने तो हमे हैरान कर दिया!; Harbhajan Singhची कविता व्हायरल

Video : ऐ खुदा, तुने तो हमे हैरान कर दिया!; Harbhajan Singhची कविता व्हायरल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोरोना व्हायरसनं जगाला वेठीस धरलं आहे. जगभरातील कोरोना रुग्णांचा आकडा हा 38 लाख 21,494 इतका झाला आहे. त्यापैकी 13 लाख, 03,692 रुग्ण बरे झाले असून 2 लाख 65,115 जणांचा प्राण गमवावे लागले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर केले आहे. भारतातही 17 मे पर्यंल लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे अनेक क्रीडा स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.  अशात खेळाडूंकडे आपल्या कुटुंबीयांना वेळ देण्यासाठी पुरेसा वेळ मिळत आहे. अशात भारताचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंगनं गायलेली एक कविता व्हायरस होत आहे. 

भज्जीनं गुरुवारी एक व्हिडीओ पोस्ट केला, त्यात त्यानं हकाम भक्त्रीवाला यांनी लिहिलेल्या कवितेचं वाचन केलं. भज्जीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. सुरेश रैना, व्हिव्हिएस लक्ष्मण, आकाश चोप्रा आदींनी भज्जीचं कौतुक केलं आहे.

 दरम्यान,  भारताचा अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंगनं मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना व्हायरसचे संकट संपल्यानंतर भज्जीनं पंजाबमध्ये जाऊन शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. आर अश्विनसोबत इंस्टाग्राम लाईव्ह चॅटमध्ये भज्जीनं हा निर्णय सांगितला. 39 वर्षीय भज्जीनं सांगितलं की शेती करणार आणि गरजूंना अन्नधान्य वाटणार आहे. ''या संकटातून आपण काहीतरी शिकावं, यासाठी देव आपली परीक्षा घेत आहे. आपण सातत्यानं दौरे करतो, घरच्यांना वेळ देत नव्हतो. आपण पैशांच्या मागे पळत होतो. आता देवाने आपल्याला स्वतःला वेळ देण्याची संधी दिली आहे. आपण नक्की कुठे आहोत, याची चाचपणी करण्याची संधी देवानं दिली आहे,'' असे भज्जी म्हणाला.

Mohammed Shamiचं नाव का बदनाम करतेस? हसीन जहाँच्या नव्या व्हिडीओवर नेटिझन्स संतापले  

रोहित शर्मानं दिली Good News; मोठ्या आनंदात केलं नव्या पाहुण्याचं स्वागत

Sachin Tendulkarसाठी कन्येनं बनवली स्पेशल डिश; 60 सेकंदात फस्त 

...जणू काही मूल झाल्याशिवाय स्त्रीच्या जन्माचं सार्थकच होत नाही; Sania Mirza ची '(वु)मन की बात'

Web Title: Harbhajan Singh shows his poetic side amid lockdown svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.