भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा अजूनही सुरू आहेत. धोनीचे चाहते त्याला पुन्हा मैदानावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. इंडियन प्रीमिअर लीगमधून ( आयपीएल ) धोनी कमबॅक करेल असे सर्वांना वाटले होते, परंतु कोरोना व्हायरसमुळे आयपीएलची शक्यताही मावळत चालली आहे. त्यामुळे धोनीचे टीम इंडियातील पुनरागमनही अवघड होत चालले आहे. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे.''धोनीलाच वर्ल्ड कप नंतर क्रिकेटपासून दूर रहायचं होतं,''अशी माहिती माजी निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी दिली.
वर्ल्ड कपनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय धोनीचाच होता, असं ते म्हणाले. ''धोनीला कुणी संघाबाहेर केले नाही आणि त्याचा निवृत्तीचाही कोणताच विचार नव्हता. 2019च्या वर्ल्ड कपनंतर धोनीला ब्रेक हवा होता. पण, तो ब्रेक एवढा लांब असेल, असे वाटले नव्हते. त्यामुळे आम्ही रिषभ पंतची निवड केली.''
''लोकेश राहुलही यष्टिमागे उत्तम कामगिरी करत आहे. त्यानं न्यूझीलंड दौऱ्यात त्याच्यावरील जबाबदारी योग्यरितीनं पार पाडली. आयपीएल झालं असतं तर धोनीची यष्टींमागील चपळता आणि फलंदाजीतील फटकेबाजी पाहायला आवडले असते,'' असेही प्रसाद म्हणाले.
धोनीनं 90 कसोटी सामन्यांत 38.09 च्या सरासरीनं 6 शतकं व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. 350 वन डे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ही 50.57 इतकी आहे. त्याच्या 10773 धावांत 10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 98 सामन्यांत 1617 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर 256 झेल व 38 स्टम्पिंग, वन डेत 321 झेल व 123 स्टम्पिंग आणि ट्वेंटी-20त 57 झेल व 34 स्टम्पिंग आहेत.
दरम्यान, आयपीएलवर अनिश्चिततेचं सावट असताना धोनीनं सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धेत खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यानं तसे झारखंड क्रिकेट असोसिएशनला कळवले आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर त्यावरचा निर्णय होण्याची शक्यता आहे. झारखंड क्रिकेट मंडळाच्या अधिकाऱ्यानं एका वेबसाईटला सांगितले की,''धोनी सध्या झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय संकुलात कसून सराव करत आहे. तो राज्य संघाच्या संपर्कात आहे. 38 वर्षीय धोनीनं 2007मध्ये सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धेत सहभाग घेतला होता. तेव्हा त्यानं चार सामन्यांत 61.50च्या सरासरीनं 123 धावा केल्या होत्या.''
Handwara Militant Attack: जवाब जरूर मिलेगा; बबिता फोगाटचा दहशतवाद्यांना इशारा
1992 नंतर पाकिस्तान वर्ल्ड कप जिंकू नये, ही तर Wasim Akramची इच्छा; माजी कर्णधाराची टीका
2011चा वर्ल्ड कप 'या' खेळाडूमुळे जिंकलो; Suresh Rainaचा मास्टर स्ट्रोक
Corona Virus : 7 वर्षीय कॅन्सरग्रस्त मुलाला WWE स्टार जॉन सीनानं दिलं सरप्राईज
Web Title: 'He didn't want to play for sometime', MSK Prasad explains reason behind MS Dhoni's absence svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.