कोट्यवधींची सपत्ती असलेली व्यक्ती कुणाचे 1800 रुपये थकवेल, असा अंदाजही कुणी बांधू शकत नाही आणि जर ती व्यक्ती महेंद्रसिंग धोनी असेल तर... मग डोकं चक्रावल्याशिवाय राहणार नाही. पण, हे खरं आहे... झारखंड क्रिकेट असोसिएशननं त्यांचा वार्षीक अहवाल नुकताच सादर केला आणि त्यातून ही बाब समोर आली. भारताच्या माजी कर्णधारानं नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आणि आयपीएलमध्ये धडाकेबाज खेळी करण्यासाठी तो सज्ज झाला आहे.
हॉटेल रुमवरून नाराज झाल्यानं सुरेश रैनानं दुबई सोडली?; यश डोक्यात गेल्याचा श्रीनिवासन यांचा आरोप
मार्च 2020मध्ये धोनीच्या नेट वर्थ ही 800 कोटी होती आणि झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या 2019-20 अहवालात धोनीच्या नावावर 1800 रुपये थकीत दाखवण्यात आल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. थकीत रक्कम ही संघटनेच्या लाईफटाईम मेंबरशीपची ( 10000 रुपये) 18 टक्के GST आहे. ''लाईफ टाईम मेंबरशीपची GST रक्कम थकीत आहे आणि आम्ही त्याला याबाबत कळवले आहे,''असे क्रिकेट असोसिएशनचे सचिव संजय सहाय यांनी सांगितले.
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार धोनीला लाईफ टाईम सदस्य बनवण्याचा प्रस्ताव गतवर्षी सप्टेंबरमध्ये कमिटी सदस्यांनी ठेवला आणि पुढील महिन्यात तो मान्यही केला गेला. मागील महिन्यात 39 वर्षीय धोनीला लाईफ टाईम सदस्यत्व देण्यात आले.
धोनीची कामगिरी...
धोनीनं 90 कसोटी सामन्यांत 38.09 च्या सरासरीनं 6 शतकं व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. 350 वन डे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ही 50.57 इतकी आहे. त्याच्या 10773 धावांत 10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 98 सामन्यांत 1617 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर 256 झेल व 38 स्टम्पिंग, वन डेत 321 झेल व 123 स्टम्पिंग आणि ट्वेंटी-20त 57 झेल व 34 स्टम्पिंग आहेत.
Web Title: Here's why MS Dhoni owes Rs 1,800 to Jharkhand State Cricket Association
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.