'हिंदूंसाठी ऐतिहासिक दिवस', पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूकडून 'जय श्री राम'चा जयघोष!

कैक वर्षांपासून रामभक्त ज्या क्षणाची प्रतीक्षा करीत होते, त्या राम मंदिराच्या बांधकामाला आता लगेचच सुरुवात होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 10:57 AM2020-08-06T10:57:19+5:302020-08-06T10:58:09+5:30

whatsapp join usJoin us
'Historic day for Hindus' - Former Pakistan cricketer Danish Kaneria on Ram temple bhoomi poojan | 'हिंदूंसाठी ऐतिहासिक दिवस', पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूकडून 'जय श्री राम'चा जयघोष!

'हिंदूंसाठी ऐतिहासिक दिवस', पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूकडून 'जय श्री राम'चा जयघोष!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कैक वर्षांपासून रामभक्त ज्या क्षणाची प्रतीक्षा करीत होते, त्या राम मंदिराच्या बांधकामाला आता लगेचच सुरुवात होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचे बुधवारी शास्त्रोक्त पद्धतीने विधिपूर्वक भूमिपूजन झाले आणि देशातील सर्वच मंदिरांमध्ये ‘जय श्रीराम’ असा जयघोष झाला. हा दिवस रामभक्तांसाठी सुवर्णदिन ठरला. या ऐतिहासिक दिनी पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूनंही जय श्रीरामचा जयघोष केला. 

भूमिपूजनासाठी सजलेल्या अयोध्येत दिवाळीच सुरू झाली. भूमिपूजन समारंभ मोजक्या १७५ मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला; पण आता राम मंदिर उभे राहणार, याचा आनंद जगभरातील रामभक्तांना झाला. पंतप्रधान मोदी यांचे दुपारी ११ वाजता समारंभासाठी आगमन झाले. भूमिपूजनाआधी हनुमानगढीचे त्यांनी दर्शन घेतले, तिथे साष्टांग प्रणाम घातला. मंदिराजवळ पारिजातकाचे रोप लावले. विराजमान रामलल्लाचेही दर्शन घेतले. 

भूमिपूजन समारंभानंतर मान्यवर व साधू, संत व महंत यांच्याशी संवाद साधताना मोदी यांनीही ‘जय श्रीराम’चा नारा दिला. विशेष टपाल तिकिटाचे त्यांनी अनावरण केले. रा. स्व. संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल व राम मंदिर न्यासाचे नृत्य गोपाल दास हेही मंचावर होते.     

Video : सगळे तिला समजावत होते डाईव्ह नको मारू, पण तिनं ऐकलं नाही; पुढे काय झालं तुम्हीच बघा!

पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कानेरीया यानं ट्विट केलं की,''आज जगभरातील तमाम हिंदूंसाठी ऐतिहासिक दिवस आहे.''


''भगवान रामाचे सौंदर्य हे त्याच्या नावात नाही, तर त्याच्या चारित्र्यावर आहे. वाईटावर विजय मिळविण्याचे तो प्रतिक आहे. आज जगभरात आनंदाची लाट आहे. हा मोठा समाधानाचा क्षण आहे,''असेही कानेरीया म्हणाला.  

यावेळी मोदी म्हणाले की, हे राममंदिर भारताच्या आधुनिक संस्कृतीचे प्रतिक बनेल, आपल्या शाश्वत आस्तेचे प्रतिक बनेल. आपल्या राष्ट्रीय भावनेचे प्रतिक बनेल आणि कोट्यवधी लोकांच्या सामूहिक संकल्पशक्तीचेही प्रतिक बनेल. आजचा हा दिवस केवळ एतिहासिकच नव्हे तर न भूतो, न भविष्यती असा असल्याचे सांगून मोदी पुढे म्हणाले की, येथे उभारले जाणारे मंदिर ही सत्य, अहिंसा, आस्था व बलिदानाला न्यायप्रिय भारताने दिलेली अनूपम भेट आहे. यामुळे भारताची किर्तीपताका युगान्युगे दिगंतात फडकत राहील.

Fact Check : ब्रायन लाराचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह? वेस्ट इंडिजच्या दिग्गज खेळाडूनं सांगितलं सत्य

Web Title: 'Historic day for Hindus' - Former Pakistan cricketer Danish Kaneria on Ram temple bhoomi poojan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.