कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी संपूर्ण देश एकजुटीनं लढाई देत आहे. पण, काही माथेफिरू लोकं यातही जात-धर्माची पोळी शेकवत आहेत. भारतीय संघाचा माजी गोलंदाज इरफान पठाणनं अशा लोकांना सज्जड दम भरला आहे. त्यानं इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करून जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांना मार्मिक टोला लगावला आहे. यापूर्वीही इरफाननं हैदराबाद इन्काऊंटर, जेएनयू हिंसा, दिल्ली दंगल या सर्व प्रकरणावर स्पष्ट मत मांडले होते. आता त्यांनी धर्माच्या नावाखाली चालणारा धंदा बंद करा, असे आवाहन केले आहे.
पठाण बंधूंचे समाजकार्यात एक पाऊल पुढे; गरजूंसाठी दान केले 10 हजार किलो तांदूळ
पोस्ट केलेल्या व्हिडीओत तो म्हणतो,''जगाच्या निर्मितापासून धर्माच्या नावाखाली धंदा सुरू आहे. पण, खेदाची बाब ही की समजुतदारही आंधळा होत चालला आहे. काही मोजक्या लोकांनी धर्माचा धंदा सुरू केला, आता हा धंदा पण घाणेरडा होत चालला आहे. तुम्ही आपसात भांडाल आणि त्याला फायदा तिसराच उचलेले. आता तरी सुधरा, आता तर तुमच्याकडील वेळही कमी होत चालला आहे.''
पाहा व्हिडीओ...
दरम्यान, उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद जिल्ह्यातील नागफनी भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या कुटुंबीयांची तपासणी करण्यासाठी गेलेल्या डॉक्टर्सवर नागरिकांनी दगडफेक केल्याची घटना घडली. या हल्ल्यात एक डॉक्टर आणि दोन पोलीस जखमी झाले. भारतीय संघाचा माजी गोलंदाज
इरफान पठाणनं या व्यक्तिंचा चांगलाच समाचार घेतला. इरफान पठाणनं या लोकांचा समाचार घेतला. त्यानं लिहीलं की,''तुम्ही डॉक्टरांवरच हल्ले कराल, तर तुम्हाला वाचवणार कोण? मुरादाबाद येथे घडलेल्या प्रसंगाचा निषेध.''
केरळ राज्याचं कौतुक...
इरफाननं यावेळी केरळ राज्याचे कौतुक केले. तो म्हणाला,''कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी केरळ राज्य चांगलं काम करत आहे. गेल्या 24 तासांत केवळ एकच कोरोना रुग्ण तेथे सापडला आहे. ते योग्य पाऊल टाकत आहेत.. त्यांनी देशात सर्वाधिक चाचण्याही केल्या आहेत.''
इंग्लंडच्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील खेळाडूची कोरोनाशी लढाई; प्रकृती चिंताजनक
Read in English
Web Title: Humanity above all : irfan pathan give reply to those who spread hate message on religion svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.