ICC Women's T20 World Cup: विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूंचा 'झिंगाट' डान्स, पाहा Video

ICC Women's T20 World Cup: अ‍ॅलिसा हिली ( ७५) आणि बेथ मूनी ( ७८*) यांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई करताना १८५ धावांचे लक्ष्य उभे केले. प्रत्युत्तरात भारतीय महिलांना दडपणाखाली चांगला खेळ करता आला नाही आणि भारताचे सर्व फलंदाज ९९ धावांत तंबूत परतले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 11:40 AM2020-03-09T11:40:30+5:302020-03-09T11:41:40+5:30

whatsapp join usJoin us
ICC Women's T20 World Cup: champion Australian women player dance with Katy Perry, Watch Video svg | ICC Women's T20 World Cup: विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूंचा 'झिंगाट' डान्स, पाहा Video

ICC Women's T20 World Cup: विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूंचा 'झिंगाट' डान्स, पाहा Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियन महिला संघानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाचव्यांदा बाजी मारली. ऑस्ट्रेलियानं अंतिम लढतीत भारतीय महिला संघावर ८५ धावांनी विजय मिळवला. अ‍ॅलिसा हिली ( ७५) आणि बेथ मूनी ( ७८*) यांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई करताना १८५ धावांचे लक्ष्य उभे केले. प्रत्युत्तरात भारतीय महिलांना दडपणाखाली चांगला खेळ करता आला नाही आणि भारताचे सर्व फलंदाज ९९ धावांत तंबूत परतले. ऑस्ट्रेलियानं २०१०, २०१२, २०१४, २०१८ आणि २०२० असा पाचव्यांदा वर्ल्ड कप उंचावण्याचा पराक्रम केला. अ‍ॅलिसा हिलीला सामन्यातील, तर बेथ मूनीला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. 

या सामन्याच्या निरोप समारंभाला प्रसिद्ध पॉप सिंगर कॅटी पेरी हिच्या गाण्याचा कार्यक्रम झाला आणि त्यात ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूंनी 'झिंगाट' डान्स केला. ऑस्ट्रेलियाची सोफी मोलिनेस्कनं तर डान्स फ्लोअरला आग लावली. 

पाहा व्हिडीओ...


हायलाईट्स

  • जागतिक महिला दिनी वर्ल्ड कप उंचावून इतिहास घडवण्याची संधी टीम इंडियानं गमावली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा हुकुमी पत्ता ( फिरकी गोलंदाजी) अपयशी ठरला. ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅलिसा हिली आणि बेथ मूनी यांनी शतकी सलामी करताना टीम इंडियाच्या गोलंदाजांना शरणागती पत्करण्यास भाग पाडले. 
  • हिलीनं ३० चेंडूंत अर्धशतक झळकावले. तिचे हे ट्वेंटी-२०तील १२ वे अर्धशतक ठरले. या कामगिरीसह हिलीनं वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. हिलीचे हे अर्धशतक आयसीसी स्पर्धेतील पुरुष ( वन डे वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप ) आणि महिला ( वन डे वर्ल्ड कप, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप)  सर्वात जलद अर्धशतक ठरले. 

  • हिली आणि मूनी यांनी ११५ धावांची भागीदारी केली. महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील ही दुसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी २०१६च्या वर्ल्ड कप मध्ये वेस्ट इंडिजच्या स्टेफनी टेलर आणि हिली मॅथ्यू यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध १२० धावा चोपल्या होत्या. 
  • हिली आणि मूनी या दोघींनी टीम इंडियानं जीवदान दिले आणि ती चूक महागात पडली. फलंदांजांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर ऑसी गोलंदाजांनी व क्षेत्ररक्षकांनी आपली भूमिका चोख बजावली. ऑसींनी उभे केलेल्या आव्हानाचे दडपण टीम इंडियाच्या खेळाडूंना पेलवलं नाही आणि त्यांनी हार मानली. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

 ...तर स्टार्कला एका सेकंदात 'जोरू का गुलाम' ठरवलं असतं, सानिया मिर्झाचा खोचक टोमणा

ऑस्ट्रेलियाचा सॉलिड 'पंच'; टीम इंडियाला नमवून रचला इतिहास

तो आला, त्यानं पाहिलं अन् तिनं जिंकलं, पाहा Video

भारतीय महिला संघाच्या पराभवावर शरद पवार म्हणतात...

भारतीय महिला संघाचं नेमकं काय चुकलं?

Web Title: ICC Women's T20 World Cup: champion Australian women player dance with Katy Perry, Watch Video svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.