ICC Women's T20 World Cup : भारतीय महिला संघानं ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत विजयाची हॅटट्रिक साजरी केली. ऑस्ट्रेलिया, बांगलादेश यांच्यानंतर टीम इंडियानं न्यूझीलंडलाही हार मानण्यास भाग पाडले. शेफाली वर्माच्या फटकेबाजीनंतर भारताच्या फिरकी गोलंदाजांनी चोख कामगिरी बजावताना संघाला विजय मिळवून दिला. भारतानं हा सामना 3 धावांनी जिंकला. भारतीय संघ आज चार फिरकी गोलंदाजांसह मैदानावर उतरला होता आणि ही रणनीती उपयोगी ठरली. न्यूझीलंडच्या अॅमेली केरनं अखेरच्या दोन षटकांत तुफान फटकेबाजी करून सामन्यात चुरस निर्माण केली होती. भारतानं या विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला.
पुन्हा एकदा शेफाली वर्मा टीम इंडियासाठी तारणहार ठरली. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात शेफालीनं 46 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, परंतु अन्य फलंदाजांनी अपयशाचा कित्ता गिरवला. या सामन्यात स्मृती मानधनाचे पुनरागमन झाले. तापामुळे तिला दुसऱ्या लढतीत मुकावे लागले होते. स्मृतीनं चौकार खेचून धावांचे खाते उघडले खरे, परंतु तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ली ताहूहूच्या गोलंदाजीवर ती त्रिफळाचीत झाली. तिने केवळ 11 धावा केल्या.
शेफालीनं आपली फटकेबाजी सुरू ठेवताना किवी गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. तिनं अॅना पीटरसनच्या एका षटकात सलग दोन खणखणीत षटकार खेचून संघाला अर्धशतकी धावांकडे कूच करून दिली. 10व्या षटकात टीम इंडियाला दुसरा धक्का बसला. अॅमेलिया केरनं पहिल्याच चेंडूवर तानिया भाटीयाला बाद केले. तानिया आणि शेफाली यांनी दुसऱ्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी केली. तानियानं 23 धावा केल्या.
12व्या षटकात रोझमेरी मेयरनं टीम इंडियाला तिसरा धक्का दिला. तिनं जेमिमा रॉड्रीग्जला बाद केले. जेमिमाला 10 धावाच करता आल्या. भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हीनं अपयशाचा पाढा याही सामन्यात कायम राखला. अवघी एक धाव करून ती माघारी परतली. 14व्या षटकात न्यूझीलंडला मोठं यश मिळालं. त्यांनी टीम इंडियाच्या शेफाली वर्माला बाद केले. शेफालीनं 34 चेंडूंत 46 धावा केल्या. त्यात 4 चौकार व 3 षटकारांचा समावेश होता. भारताला 8 बाद 133 धावांवर समाधान मानावे लागले.
लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडला 34 धावांत 3 धक्के बसले. शिखा पांडे, दीप्ती शर्मा आणि पूनम यादव यांनी पहिल्या दहा षटकांत किवींना हे धक्के दिले. कॅटी मार्टीन आणि मॅडी ग्रीन यांनी चौथ्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी करताना न्यूझीलंडचा डाव सावरला. पण, राजेश्वरी गायकवाडने ही जोडी तोडली. तिनं ग्रीनला ( 24) बाद केले. राधा यादवनं घातली मार्टीनला बाद करून भारताला मोठं यश मिळवून दिलं. मार्टीननं 25 धावा केल्या. क्षेत्ररक्षकांनीही गोलंदाजांना साजेशी साथ दिली. अॅमेली केरनं 19व्या षटकात पूनम यादवच्या गोलंदाजीवर 18 धावा चोपून काढल्या. केरनं चार चौकार खेचले, परंतु तिला अखेरच्या 6 चेंडूंत विजयासाठीच्या 16 धावा करता आल्या नाही. न्यूझीलंडला 20 षटकांत 6 बाद 129 धावांवर समाधान मानावे लागले.
सामन्यात रंगला थरार
स्पर्धेतील सर्वात यशस्वी गोलंदाज असलेल्या पूनम यादवनं टाकलेल्या 19व्या षटकात अॅमेली केरनं 18 धावा चोपून काढताना सामन्यात चुरस निर्माण केली. त्यात अखेरच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हायली जेन्सनला चौकार मिळाला. शिखा पांडेनं अचून मारा करताना न्यूझीलंडला 3 धावांनी हार मानण्यास भाग पाडले. केरनं 19 धावांत नाबाद 34 धावा केल्या.
भारत-पाकिस्तान अन् शारजाहच नातं पुन्हा जुळणार; मार्चमध्ये क्रिकेटचा महामुकाबला होणार
Video : क्रिकेटपासून दूर असलेला महेंद्रसिंग धोनी बनला शेतकरी; करतोय सेंद्रीय शेती
IPL 2020 : विराट कोहली ते एबीडी... जाणून घ्या, कोणाला किती 'पगार' देते RCB!
Delhi Violence : दिल्लीतील हिंसाचारावर रोहित शर्मानं व्यक्त केली चिंता, म्हणाला...
सराव सत्रात टीम इंडियाचा ओपनर दुखापतग्रस्त; विराट कोहली त्रस्त
Sunrisers Hyderabad संघाकडून Breaking News; कर्णधारपदाची माळ स्फोटक फलंदाजाकडे
Read in English
Web Title: ICC Women's T20 World Cup: India Women win by 4 runs, qualified for semifinal svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.