भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुसरी कसोटी: न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतही भारताच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. कालच्या ६ बाद ९० धावांवरून आजचा खेळ सुरू करणारा भारतीय संघ १२४ धावांत तंबूत परतला. ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊदी यांच्यासमोर टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज ढेपाळले. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी १३२ धावांचे लक्ष्य सहज पार करून दोन सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली. न्यूझीलंडनं या विजयानंतर ICC World Test Championship मध्ये टीम इंडियाला मोठा धक्का दिला आहे. दोन सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने 120 गुणांची कमाई करताना तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.
दुसऱ्या डावात मयांक अग्रवाल अपयशी ठरला. ट्रेंट बोल्टनं त्याला ३ धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर पृथ्वी शॉ ( १४) टीम साऊदीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. कॉलीन डी ग्रँडहोमनं टीम इंडियाचा कर्णधार विराटला ( १४) पायचीत केले. त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी संयमी खेळ दाखवला. पण, रहाणे ( ९) आणि पुजारा ( २४) हे दोघेही माघारी परतले. टीम इंडियानं दिवसअखेर ६ बाद ९० धावा करताना ९७ धावांनी आघाडी वाढवली होती. तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात रिषभ पंत आणि हनुमा विहारी यांना खिंड लढवायची होती, परंतु तेही अपयशी ठरले. भारताच्या तळाच्या चार फलंदाजांना तिसऱ्या दिवशी केवळ ३४ धावा जोडता आल्या. भारताचा दुसरा डाव १२४ धावांत गडगडला. न्यूझीलंडसमोर विजयासाठी केवळ १३२ धावांचे आव्हान ठेवण्यात टीम इंडियाला यश आले. ट्रेंट बोल्टने चार आणि टीम साऊदीने ३ विकेट्स घेतल्या.
न्यूझीलंडचे सलामीवीर टॉम लॅथम आणि टॉम ब्लंडल यांनी पहिल्या विकेटसाठी भक्कम भागीदारी करताना टीम इंडियाचा पराभव निश्चित केला. लॅथमला 52 धावांवर उमेश यादवनं माघारी पाठवलं. त्यानंतर आलेला केन विलियम्सनही ( 5) लगेच बाद झाला. ब्लंडलने 55 धावांच्या खेळीत 8 चौकार व 1 षटकार खेचले. त्याला जसप्रीत बुमराहनं बाद केले. न्यूझीलंडने हा सामना 7 विकेट्स राखून जिंकला. विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला प्रथमच व्हाईटवॉश स्वीकारावा लागला आहे. कर्णधार म्हणून हा विराटचाही पहिलाच व्हाईटवॉश आहे.
न्यूझीलंडनं या विजयानंतर ICC World Test Championship मध्ये टीम इंडियाला मोठा धक्का दिला आहे. दोन सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने 120 गुणांची कमाई करताना तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत टीम इंडियाचा हा पहिलाच व्हाईटवॉश ठरला आहे. सात सामन्यानंतर टीम इंडियाची विजयाची मालिका खंडित झाली आहे. तरिही टीम इंडिया 360 गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहे. दुसऱ्या स्थानवार असलेली ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 296 गुण आहेत. न्यूझीलंडनं या मालिकेतील 120 गुणांसह खात्यात 180 गुण जमा केले आहेत. त्यांनी या मालिका विजयानंतर इंग्लंड ( 146) आणि पाकिस्तान ( 140) यांना मागे टाकून तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.
न्यूझीलंडकडून भारताला व्हाईटवॉश; दुसऱ्या कसोटीसह मालिका जिंकली
टीम इंडियाच्या पराभवानंतर विराट कोहलीच्या नावावर लाजीरवाणा विक्रम
Web Title: ICC World Test Championship: A full 120 points for New Zealand from the India vs New Zealad Test series, move on third spot svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.