IND - PAK : भारताचा सातव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश, पाहा कधी पटकावले जेतेपद...

IND - PAK U19 ICC World Cup 2020 : भारताने यापूर्वी आतापर्यंत सहावेळा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. या सहापैकी चारवेळा भारतावे विश्वचषक जिंकला आहे. अंतिम फेरीतील भारताची कामगिरी सरस असून हा विश्वचषक भारत जिंकणार का, हे येत्या काही दिवसांमध्ये समजू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 08:35 PM2020-02-04T20:35:41+5:302020-02-04T20:38:36+5:30

whatsapp join usJoin us
Ind U19 vs Pak U19: India enter in seventh final, see when in win and lost ... | IND - PAK : भारताचा सातव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश, पाहा कधी पटकावले जेतेपद...

IND - PAK : भारताचा सातव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश, पाहा कधी पटकावले जेतेपद...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील आजच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने पाकिस्तावर दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने आतापर्यंत सातव्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

भारताने यापूर्वी आतापर्यंत सहावेळा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. या सहापैकी चारवेळा भारतावे विश्वचषक जिंकला आहे. अंतिम फेरीतील भारताची कामगिरी सरस असून हा विश्वचषक भारत जिंकणार का, हे येत्या काही दिवसांमध्ये समजू शकते.

19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील आजच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने पाकिस्तावर दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केले आहे. उपांत्य फेरीत भारताने पाकिस्तानवर १० विकेट्स राखून मोठा विजय मिळवला. यशस्वी जैस्वालने षटकार लगावत आपले शतक पूर्ण करत भारताच्या विजयावरही शिक्कामोर्तब केले. यशस्वीने आठ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद १०५ धावांची धडाकेबाज खेळी साकारली, दिव्यांश सक्सेनाने सहा चौकारांच्या जोरावर नाबाद ५९ धावा करून यशस्वीला सुयोग्य साथ दिली.

भारताच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत पाकिस्तानचा डाव १७२ धावांमध्ये आटोपला होता. या आव्हानाचा भारताना सुरेखपणे पाठलाग केला. भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतके पूर्ण करत संघाला विजय मिळवून दिला. यशस्वी जैस्वाल आणि दिव्यांश सक्सेना यांनी दमदार फलंदाजी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

भारताने २०००, २००८, २०१२ आणि २०१८ साली युवा विश्वचषक जिंकला होता. त्याचबरोबर २००६ आणि २०१६ मध्ये भारतीय संघ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला होता, पण त्यांना जेतेपद पटकावता आले नव्हते.
 

Web Title: Ind U19 vs Pak U19: India enter in seventh final, see when in win and lost ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.