India vs England Test : भारत-इंग्लंड यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आलेला दिवस-रात्र कसोटी ( Day Night Test) सामन्याचा निकाल अवघ्या दोन दिवसांत लागला. तिसऱ्या कसोटीतील ३० विकेट्सपैकी २८ विकेट्स या फिरकी गोलंदाजांनी घेतल्या आणि खेळपट्टीवरून वाद सुरू झाला. अशात भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन ( Former Cricketer Mohammad Azharuddin) यानं टर्निंग खेळपट्टीवर कशी फलंदाजी करावी, यासाठी अजब गजब सल्ला दिला. ५८ वर्षीय अझरुद्दीननं अशा खेळपट्टीवर स्पाइक बुटांऐवजी रबरचे सोल असलेले बुट घालणे योग्य ठरेल, असा सल्ला दिला. इंग्लंडला मोठा धक्का; कसोटी मालिका मध्येच सोडून खेळाडू परतला माघारी
अझरुद्दीननं ट्विट केलं की,''फलंदाजी करताना स्पाइक बुट घालण्यात काहीच अर्थ नाही. रबरचे सोल असलेल्या बुटांमुळे फलंदाजांचे कौशल्य कमी होत नाही. कसोटी क्रिकेटमध्ये खडतर खेळपट्टींवर मी काही अविश्वसनीय खेळी पाहिल्या आहेत, ज्या खेळाडूंनी रबरचे सोल असलेले बुट घालून खेळल्या आहेत. अशात धाव घेताना खेळाडू घसरून पडू शकतो, असा तर्क लावला जात आहे, परंतु विम्बल्डनमध्ये खेळाडू रबरचे सोल असलेली बुट घालूनच खेळतात.'' ख्रिस गेलची पाकिस्तान सुपर लीगमधून माघार; कारण समजल्यावर 'युनिव्हर्स बॉस'चा वाटेल अभिमान
अझरुद्दीननं १९८५ ते २००० या कालावधीत भारताकडून ९९ कसोटी आणि ३३४ वन डे सामने खेळले आहेत. तो म्हणाला,''सुनील गावस्कर, मोईंदर अमरनाथ आणि दिलीप वेंगसरकर या भारतीय खेळाडूंसह व्हीव्हीयन रिचर्ड्स, माइक गँटिंग, अॅलन बोर्डर, क्लाईव्ह लॉईड आणि अन्य खेळाडूंचे नाव सर्वप्रथम समोर येतं.''
IPL 2021 Venues : मुंबईकर यंदा आयपीएलच्या सामन्यांना मुकणार; BCCIने निवडली पाच शहरं, फायनल अहमदाबादमध्ये? तिसऱ्या कसोटीत ज्या पद्धतीनं फलंदाजांनी शरणागती पत्करली त्यावर अझरुद्दीननं नाराजी व्यक्त केली. ''अहमदाबाद कसोटीत फलंदाजांना गुडघे टेकताना पाहून निराश झालो. अशा खेळपट्टीवर शॉर्ट सिलेक्शन आणि फुटवर्क हे अत्यंत महत्त्वाचं असतं,''असे अझरुद्दीन म्हणाला.
Web Title: IND v ENG 2021: Mohammed Azharuddin suggests batsmen to wear shoes with rubber soles to tackle turning pitches
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.