Border-Gavaskar Trophy : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावकर ट्रॉफी स्पर्धेची उत्सुकता अगदी शिगेला पोहचली आहे. पण या मालिकेला सुरुवात होण्याआधी भारतीय ताफ्यातील खेळाडूंच्या दुखापतीचं ग्रहण लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर बीसीसीआय २२ नोव्हेंबर पासून रंगणाऱ्या पर्थ कसोटी सामन्याआधी एक मोठा डाव खेळण्याच्या तयारीत असल्याचे दिसते. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, भारत 'अ' संघातील दोन युवा खेळाडूंना टीम इंडियात 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री मिळू शकते.
BCCI अन् संघ व्यवस्थापन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्याला पोहचण्याआधी ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली भारत 'अ' संघ आणि ऑस्ट्रेलिया 'अ' संघ यांच्यात दोन सामन्यांची अनौपचारिक कसोटी सामने खेळवण्यात आले होते. या ताफ्यातील देवदत्त पडिक्कल आणि साई सुदर्शनं या दोघांना टीम इंडियासोबत ठेवण्याचा निर्णय भारतीय संघ व्यवस्थान घेऊ शकते.
टीम इंडियाच्या ताफ्यात दुखापतीच 'ग्रहण'
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या पर्थ कसोटी सामन्याआधी भारतीय संघ आणि भारत 'अ' यांच्यात प्रॅक्टिस मॅच खेळवण्यात येत आहे. साई सुदर्शन आणि देवदत्त पडिक्कल भारत 'अ' संघाचा भाग आहेत. मॅच प्रक्टिस दरम्यान भारतीय ताफ्यातील काही खेळाडूंना दुखापत झाली आहे. विराट कोहली, सर्फराज खान शंभर टक्के फिट नाहीत, अशी चर्चा आहे. एवढेच नाही तर या यादीत लोकेश राहुलसह शुबमन गिलचंही नाव आहे.
वेळ प्रसंगी या दोघांची टीम इंडियातही होऊ शकते एन्ट्री
सराव सामन्यात लोकेस राहुल हा बॅटिंग करताना दुखापतग्रस्त झाला होता. शुबमन गिल याला फिल्डिंग वेळी हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. तो पहिल्या कसोटीला मुकणार असल्याचेही बोलले जात आहे. ताफ्यातील खेळाडूंच्या दुखापतीमुळे टीम इंडियाचे टेन्शन वाढलं आहे. त्यामुळे बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापन बॅकअप खेळाडूंच्या रुपात भारत 'अ' संघातील खेळाडूंना संघासोबत थांबवण्याच्या विचारात आहे. ज्यात साई सुदर्शन आणि देवदत्त पडिक्कल यांची नावे आघाडीवर आहेत. वेळ प्रसंगी या खेळाडूंना टीम इंडियात वाइल्ड कार्ड एन्ट्रीही मिळू शकते.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टिनं महत्त्वाची झालीये ही मालिका
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टिने खूपच महत्त्वाची झाली आहे. भारतीय संघाला तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेची फायनल खेळण्यासाठी ही मालिका ४-० अशा फरकाने जिंकायची आहे. जर निकाल यापेक्षा वेगळा लागला तर टीम इंडियाला अन्य संघांच्या निकालावर अवलंबून रहावे ला
Web Title: IND vs AUS Sai Sudharsan And Devdutt Padikkal might Be Stay Along With Indian Team For The Border Gavaskar Trophy Report
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.