IND vs BAN : पहिल्या सामन्यात अश्विन-जड्डूची 'दादा'गिरी; गांगुली म्हणाला, "बांगलादेशने पाकिस्तानला..."

ind vs ban test 2024 news : आर अश्विनची शतकी खेळी आणि रवींद्र जडेजाच्या संयमी खेळीने भारताचा डाव सावरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 05:43 PM2024-09-19T17:43:35+5:302024-09-19T17:55:05+5:30

whatsapp join usJoin us
ind vs ban test 2024 news Sourav Ganguly praises R Ashwin and Ravindra Jadeja's innings | IND vs BAN : पहिल्या सामन्यात अश्विन-जड्डूची 'दादा'गिरी; गांगुली म्हणाला, "बांगलादेशने पाकिस्तानला..."

IND vs BAN : पहिल्या सामन्यात अश्विन-जड्डूची 'दादा'गिरी; गांगुली म्हणाला, "बांगलादेशने पाकिस्तानला..."

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ind vs ban test 2024 । चेन्नई : पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय फिरकीपटू आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी कमाल केली. विशेष बाब म्हणजे गोलंदाजीत नाही तर या जोडीने फलंदाजीने आपल्या संघाला सावरले. यशस्वी जैस्वाल वगळता भारताच्या एकाही आघाडीच्या फलंदाजाला साजेशी खेळी करता आली नाही. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली प्रत्येकी ६-६ धावा करुन तंबूत परतले. तर शुबमन गिलला खाते देखील उघडता आले नाही. रिषभ पंतने ३९ धावांची खेळी करुन घरच्या चाहत्यांना जागे केले. त्यानंतर अश्विन आणि जडेजा यांनी चांगली भागीदारी नोंदवत पहिल्या दिवसअखेर पाहुण्या संघाला सातव्या बळीसाठी तरसवले. भारताने पहिल्या दिवसअखेर ८० षटकांत ६ बाद ३३९ धावा केल्या. 

टीम इंडियाकडून आर अश्विनने सर्वाधिक धावा केल्या, त्याने २ षटकार आणि १० षटकारांच्या मदतीने ११२ चेंडूत नाबाद १०२ धावा कुटल्या. याशिवाय रवींद्र जडेजा ८६ धावांसह खेळपट्टीवर टिकून आहे. यशस्वी जैस्वाल (५६) धावा करुन बाद झाला. तर लोकेश राहुल (१६) धावा करुन मेहदी हसनचा शिकार झाला. खरे तर अश्विन आणि जडेजा यांच्या संयमी खेळीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. ४२.२ षटकांत भारताची धावसंख्या ६ बाद १४४ अशी होती. संघ अडचणीत असताना अश्विनने शतकी खेळी करुन पाहुण्यांचा चांगलाच समाचार घेतला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सलामीचा सामना खेळवला जात आहे. 

भारताचे माजी खेळाडू अश्विन आणि जडेजाचे तोंडभरुन कौतुक करत आहेत. सौरव गांगुली यांनी देखील या जोडीच्या खेळीला दाद देताना पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील मालिकेचा दाखला दिला. आर अश्विनने चांगली खेळी केली. त्यानंतर जडेजाने देखील डाव सावरला. केवळ धावाच नाही तर फलंदाजीचा दर्जाही उच्च दर्जाचा होता. बांगलादेशच्या एका अतिशय चांगल्या गोलंदाजी आक्रमणाविरुद्ध ते टिकून राहिले. बांगलादेशने पाकिस्तानला पाकिस्तानमध्ये पराभूत केले यात आश्चर्य नाही, असे सौरव गांगुली यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले. एकूणच बांगलादेशच्या घातक गोलंदाजीविरुद्ध फलंदाजी करणे सोपे नसल्याचे त्यांनी नमूद केले.

पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ - 
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, मोहम्मद सिराज. 

Web Title: ind vs ban test 2024 news Sourav Ganguly praises R Ashwin and Ravindra Jadeja's innings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.