ठळक मुद्देइंग्लंडच्या १३९ षटकांत ४ बाद ४१६ धावा, जो रूट १८४ धावांवर खेळतोयबेन स्टोक्स ११८ चेंडूंत १० चौकार व ३ षटकार खेचून ८२ धावांवर माघारी
India vs England, 1st Test : इंग्लंडचा कर्णधार जो रूट ( Joe Root) याची फटकेबाजी दुसऱ्या दिवशीही पाहायला मिळत आहे आणि त्याला अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स ( Ben Stokes) याचीही दमदार साथ मिळाली. शाहबाज नदीमनं लंच ब्रेकनंतर स्टोक्सला बाद करून भारताला मोठं यश मिळवून दिलं, परंतु तोपर्यंत इंग्लंडनं ऐतिहासिक कामगिरी केली होती. स्टोक्स ११८ चेंडूंत १० चौकार व ३ षटकार खेचून ८२ धावांवर माघारी परतला. पण, रूट दुसऱ्या बाजूनं खिंड लढवत आहे. इंग्लंडनं २००४ ( दक्षिण आफ्रिका) व २००५ ( पाकिस्तान) सालानंतर प्रथमच परदेशात पहिल्या डावात ४००+ धावा करण्याचा पराक्रम आज केला. अर्जुन तेंडुलकरनं कोणत्या नियमानुसार नोंदवलं IPL 2021 Auctionसाठी नाव?; जाणून घ्या उत्तर
१२७व्या षटकात भारताला रूट व स्टोक्सची जोडी तोडण्यात यश आलं. नदीमच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या प्रयत्नात स्टोक्स चेतेश्वर पुजाराच्या हातून झेलबाद झाला. रुट व स्टोक्स या जोडीनं चौथ्या विकेटसाठी २२१ चेंडूंत १२४ धावांची भागीदारी केली. तत्पूर्वी रुटनं तिसऱ्या विकेटसाठी डॉम सिब्लीसह २०० धावा जोडल्या होत्या. इंग्लंडनं कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच भारतात तिसऱ्या व चौथ्या विकेटसाठी एकाच डावात शतकी भागीदारी करण्याचा विक्रम केला. यापूर्वी त्यांनी पाच वेळा भारताविरुद्ध अशी कामगिरी केली होती, परंतु त्या सर्व त्यांच्या देशात. २०११ ( एडबस्टन व ट्रेंट ब्रीज), १९९० ( लॉर्ड्स), १९७९ ( एडबस्टन) व १९६७ ( हेडिंग्ली) येथे त्यांनी ही कामगिरी केली होती. जो रूटचा भन्नाट फॉर्म, टीम इंडियाची धुलाई करताना ९३ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी
पहिल्या दिवशी त्यानं डॉम सिब्लीसह दोनशे धावांची भागीदारी करून इंग्लंडच्या धावसंख्येचा मजबूत पाया घातला होता. त्यावर स्टोक्स धावांचे इमले रचत आहे. भारतीय गोलंदाज ही जोडी तोडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत, परंतु क्षेत्ररक्षकांकडून त्यांना साजेशी साथ मिळताना दिसत नाही. त्यात विराट कोहली ( Virat Kohli) आणि DRS यांच्यातील ३६ चा आकडा याही सामन्यात दिसला. अवघ्या १५ मिनिटांत विराटनं दोन DRS गमावले, तर स्टोक्सचे दोन झेलही सुटले. एक धावबादही सोडला. टीम इंडियाचं चाललंय तरी काय?; १५ मिनिटांत दोन झेल सुटले, दोन DRS गमावले अन् सोपा Run Out सोडला!
Web Title: IND vs END, 1st Test : This is the first time England have posted 400+ in the first innings of successive away series since 2005
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.