IND vs ENG, 1st ODI : टीम इंडियाचे दोन प्रमुख खेळाडू जायबंदी; एकाला नेलं हॉस्पिटलमध्ये, तर एक मैदानाबाहेर

IND vs ENG, 1st ODI : सर्व टीम इंडियाच्या बाजूनं सुरू असताना एक धक्कादायक ट्विट BCCIनं केलं. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 08:18 PM2021-03-23T20:18:45+5:302021-03-23T20:19:16+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG, 1st ODI : Shreyas Iyer subluxated his left shoulder, He has been taken for further scans; Rohit Sharma was hit on the right elbow  | IND vs ENG, 1st ODI : टीम इंडियाचे दोन प्रमुख खेळाडू जायबंदी; एकाला नेलं हॉस्पिटलमध्ये, तर एक मैदानाबाहेर

IND vs ENG, 1st ODI : टीम इंडियाचे दोन प्रमुख खेळाडू जायबंदी; एकाला नेलं हॉस्पिटलमध्ये, तर एक मैदानाबाहेर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs ENG, 1st ODI : भारतीय फलंदाजांच्या दमदार कामगिरीला इंग्लंडच्या सलामीवीरांकडून सडेतोड उत्तर मिळालं. जेसन रॉय व जॉनी बेअरस्टो यांनी पहिल्या विकेटसाठी १३५ धावांची भागीदारी केली. पदार्पणवीर प्रसिद्ध कृष्णानं ( Prasidh Krishna) पहिल्या स्पेलमध्ये ३ षटकांत ३७ धावा दिल्या होत्या. पण, कॅप्टन विराट कोहलीनं त्याला पुन्हा गोलंदाजीला आणले आणि त्यानंतर त्यानं सलग दोन षटकांत दोन विकेट्स घेत कमाल केली. त्यानं जेसन रॉय आणि बेन स्टोक्स यांना माघारी पाठवून संघाला मोठे यश मिळवून दिले. त्यानंतर शार्दूल ठाकूरनंही ( Shardul Thakur) सलग दोन षटकांत दोन विकेट्स घेत इंग्लंडला बॅकफूटवर टाकलं. सर्व टीम इंडियाच्या बाजूनं सुरू असताना एक धक्कादायक ट्विट BCCIनं केलं. 1st odi ind vs eng Live udates Score Mca Stadium प्रसिद्ध कृष्णानं घेतल्या ७ चेंडूंत २ विकेट्स; पण, विराट कोहलीनं झेलही सोडला अन् संधीही गमावली

भारताचा सलामीवीर रोहित शर्मा ( Rohit Sharma won't take the field ) याला फलंदाजी करताना उजव्या हाताच्या कोपऱ्याला चेंडू लागला. तरीही त्यानं फलंदाजीत २८ धावांचं योगदान दिलं. पण, त्याला दुखापतीमुळे मैदानावर क्षेत्ररक्षणाला येता आलं नाही. इंग्लंडच्या डावाच्या ८व्या षटकात क्षेत्ररक्षण करताना श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली. (  Shreyas Iyer subluxated his left shoulder in the 8th over while fielding) त्यानंतर त्याला स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. तो या सामन्यात मैदानावर उतरू शकणार नसल्याचे BCCIनं स्पष्ट केलं. त्याची दुखापत किती गंभीर आहे, हे स्कॅनचा रिपोर्ट आल्यावर समजेल.  1st ODI live, 1st odi ind vs eng Live


शिखर धवन (९८) आणि रोहित शर्मा ( 28) यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. विराट कोहली ६० चेंडूंत ५६ धावा करून माघारी परतला. कृणाल पांड्या ( Krunal Pandya) व लोकेश राहुल ( KL Rahul) यांनी  चेंडूंत ११२ धावांची भागीदारी केली. या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियानं ५ बाद ३१७ धावा केल्या. कृणाल ३१ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ५८ धावांवर, तर लोकेश ४३ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारांसह ६४ धावांवर नाबाद राहिला.  1st odi ind vs eng Live Score  भावाला रडताना पाहून हार्दिक पांड्याच्याही डोळ्यात आलं पाणी, Unseen Photo!

प्रत्युत्तरात इंग्लंडच्या सलामीवीरांनी सडेतोड उत्तर दिले. जेसन रॉय ( Jason Roy) आणि जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow) यांनी पहिल्या विकेटसाठी १३५ धावांची भागीदारी केली. पदार्पणवीर प्रसिद्ध कृष्णा ( Prasidh Krishna) यानं टीम इंडियाला पहिलं यश मिळवून दिलं. त्यानं जेसन रॉयला सूर्यकुमार यादवच्या हातून झेलबाद करून माघारी पाठवले. जेसन रॉयनं ३५ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ४६ धावांची खेळी केली. बेन स्टोक्स ( १) १७व्या षटकात माघारी परतला. इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन ( २२) याला जीवदान मिळालं, परंतु शार्दूलन त्याला मोठी खेळी करू दिली नाही. जॉनी बेअरस्टो ६६ चेंडूंत ६ चौकार व ७ षटकारांसह ९४ धावांवर शार्दूलच्या गोलंदाजीवर बाद झाला. जोस बटलरलाही ( २) शार्दूलनं माघारी जाण्यास भाग पाडले.1st odi ind vs eng, ind vs eng Live, 1st odi ind vs eng कृणाल पांड्या ढसाढसा रडू लागला, त्या एका वाक्यानं सर्व भावना व्यक्त करून गेला, Video

Web Title: IND vs ENG, 1st ODI : Shreyas Iyer subluxated his left shoulder, He has been taken for further scans; Rohit Sharma was hit on the right elbow 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.