India vs England, 1st Test : जसप्रीत बुमराहची प्रतीक्षा संपली; मैदानावर उतरताच विक्रमाला गवसणी घातली

India vs England, 1st Test : इंग्लंडचा कर्णधार जो रुटनं नाणेफेक जिंकून पहिल्या कसोटीत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) याच्यासाठी खास आहे. 

By स्वदेश घाणेकर | Published: February 5, 2021 09:50 AM2021-02-05T09:50:05+5:302021-02-05T09:50:48+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG, 1st Test : Jasprit Bumrah finally playing his first Test match in India | India vs England, 1st Test : जसप्रीत बुमराहची प्रतीक्षा संपली; मैदानावर उतरताच विक्रमाला गवसणी घातली

India vs England, 1st Test : जसप्रीत बुमराहची प्रतीक्षा संपली; मैदानावर उतरताच विक्रमाला गवसणी घातली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देइंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णयभारतीय संघ पाच गोलंदाज व सहा फलंदाजांसह मैदानावर उतरला

India vs England, 1st Test :  जवळपास वर्षभरानंतर टीम इंडिया मायदेशात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावर उतरली आहे. ऑस्ट्रेलिया दौरा गाजवल्यानंतर टीम इंडिया मायदेशात विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी उत्सुक आहे. कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) रजेनंतर टीम इंडियात पुनरागमन करत आहे, त्यात इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह व आर अश्विन हेही दुखापतीतून सावरण्यासाठी सज्ज झाले आहेत. इंग्लंडचा कर्णधार जो रुटनं नाणेफेक जिंकून पहिल्या कसोटीत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) याच्यासाठी खास आहे. 

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
टीम इंडिया  (Playing XI): रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, रवीचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह,

इंग्लंड (Playing XI):  डॉम सिब्ली, रोरी बर्न्स, डॅन लॉरेन्स, जो रुट, बेन स्टोक्स, ऑली पोप, जोस बटलर, डॉम बेस, जोफ्रा आर्चर, जॅक लीच, जेम्स अंडरसन

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा ( World Test Championship) अंतिम सामना डोळ्यासमोर ठेवून मैदानावर उतरणार आहे. न्यूझीलंडनं पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रथम प्रवेश करण्याचा मान पटकावला. दुसऱ्या संघाच्या शर्यतीत भारत- इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यात चढाओढ आहे. ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिका दौऱ्या रद्द केला असला तरी भारतविरुद्ध इंग्लंड मालिकेवर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे भारत आणि इंग्लंड दोन्ही संघ WTC फायनलमध्ये स्थान पटकावण्यासाठी तयार आहेत.  Bad News; सामना सुरू होण्याआधीच टीम इंडियाला धक्का, दुखापतीमुळे खेळाडूची माघार

५ जानेवारी २०१८मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यात जसप्रीत बुमराहनं कसोटी संघात पदार्पण केलं. त्यानंतर त्यानं इंग्लंड, ऑस्ट्रेलिया. वेस्ट इंडिज व न्यूझीलंड असे दौरे गाजवले. त्यानं १७ कसोटी सामन्यांत ७९ विकेट्स घेतल्या आणि ६ बाद २७  ( वि. वेस्ट इंडिज) ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे. आज मायदेशात बुमराह प्रथमच कसोटी सामना खेळत आहे. तब्बल तीन वर्षांनंतर त्याला मायदेशात कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली.

यापूर्वी जवागल श्रीनाथनं १२ कसोटीनंतर मायदेशात पहिला सामना खेळला होता. आर पी सिंग ( ११) व सचिन तेंडुलकर ( १०) यांनाही ही प्रतीक्षा करावी लागली.  घरच्या मैदानावर पहिला सामना खेळण्यासाठी १७ किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांची प्रतीक्षा पाहावी लागलेला बुमराह हा दुसरा खेळाडू आहे. यापूर्वी वेस्ट इंडिजच्या डॅरेन गंगा ( Daren Ganga) यानं १९९८मध्ये दक्षिण आफ्रिकेत कसोटी पदार्पण केलं आणि त्यानंतर एप्रिल २००३मध्ये घरच्या मैदानावर पहिला कसोटी सामना खेळला.  


विकेट्सच्या बाबतीत बोलायचे झाल्यास. ७९ विकेट्सनंतर बुमराह घरच्या मैदानावर पहिला कसोटी सामना खेळत आहे. यापूर्वी वेस्ट इंडिजच्या अल्फ व्हॅलेंटाईन यांनी ६५ विकेट्सनंतर घरच्या मैदानावर पहिला कसोटी सामना खेळला होता.  

Web Title: IND vs ENG, 1st Test : Jasprit Bumrah finally playing his first Test match in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.