India vs England, 1st Test : चेतेश्वर पुजारा विचित्र पद्धतीनं झाला बाद; इंग्लंडच्या खेळाडूंनाही बसेना विश्वास, Video 

India vs England, 1st Test Day 3: टीम इंडियावरील फॉलोऑनचे संकट अधिक गडद होत चाललं असताना रिषभ पंत ( Rishabh Pant) व चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) पुन्हा एकदा संकटमोचक म्हणून धावून आले.

By स्वदेश घाणेकर | Published: February 7, 2021 03:38 PM2021-02-07T15:38:39+5:302021-02-07T15:39:01+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG, 1st Test : Strange dismissal for Cheteshwar Pujara, lucky for Dominic Bess to register his 3rd wicket, Video | India vs England, 1st Test : चेतेश्वर पुजारा विचित्र पद्धतीनं झाला बाद; इंग्लंडच्या खेळाडूंनाही बसेना विश्वास, Video 

India vs England, 1st Test : चेतेश्वर पुजारा विचित्र पद्धतीनं झाला बाद; इंग्लंडच्या खेळाडूंनाही बसेना विश्वास, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देचेतेश्वर पुजारा १४३ चेंडूंत ७३ धावा करून माघारी परतलापुजारा व रिषभ यांनी ११९ धावांची भागीदारी केली.

India vs England, 1st Test Day 3: टीम इंडियावरील फॉलोऑनचे संकट अधिक गडद होत चाललं असताना रिषभ पंत ( Rishabh Pant) व चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) पुन्हा एकदा संकटमोचक म्हणून धावून आले. या दोघांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा खंबीरपणे सामना करताना टीम इंडियाच्या डावाला आकार दिला. रिषभनं ट्वेंटी-20 स्टाईलनं फटकेबाजी केली. चेतेश्वर पुजाराही दमदार खेळी करत होता, परंतु विचित्र पद्धतीनं त्याला माघारी जावं लागलं. ५१व्या षटकात डॉम बेसच्या गोलंदाजीवर पुजारा बाद झाला. त्यानं १४३ चेंडूंत ११ चौकारांसह ७३ धावा केल्या.  पाहुणे जोमात, यजमान कोमात; कायले मेयर्सनं मोडला ६२ वर्षांपूर्वीचा भारतीय दिग्गजाचा विक्रम


 - जो रुटच्या ( Joe Root) द्विशतकाच्या जोरावर आणि अन्य फलंदाजांच्या महत्त्वाच्या खेळींमुळे इंग्लंडनं पहिल्या डावात ५७८ धावांचा डोंगर उभा केला. पण, जोफ्रा आर्चरनं ( Jofra Archer) चौथ्याच षटकात अप्रतिम बाऊन्सर टाकून रोहितला ( Rohit Sharma) स्तब्ध केलं. शुबमन गिलला ( Shubman Gill) आर्चरच्या गोलंदाजीवर आक्रमक फटका मारणे महागात पडले. ३८ वर्षीय जेम्स अँडरसननं अफलातून झेल घेतला. 

- विराट कोहली  (Virat Kohli) आणि चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) हे संघाचा डाव सावरतील अशी अपेक्षाही फोल ठरली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर टीम इंडियात पुनरागमन करणाऱ्या विराटकडून अपेक्षाभंग झाला. डॉम बेसनं ( Dom Bess) विराटला ११ धावांवर माघारी पाठवला. बेसनं टीम इंडियाला आणखी एक धक्का दिला. अजिंक्यचा ( १) ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसला. इंग्लंडचा कर्णधार जो रुट ( Joe Root) याने अविश्वसनीय झेल घेतला. सोपा झेल सोडला अन् फलंदाजीतही अपयशी ठरला; रोहित शर्माला इंग्लंडच्या खेळाडूनं दिली  'ही' ऑफर!

- त्यानंतर आलेल्या रिषभनं आक्रमक खेळी करताना अर्धशतक पूर्ण केलं. विराट कोहलीनंतर भारतात कसोटीतील पहिल्या तीन डावांत अर्धशतक करणारा रिषभ पंत हा दुसराच भारतीय फलंदाज ठरला. रिषभ-चेतेश्वर या जोडीनं पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. गौतम गंभीरला दुसऱ्या कसोटीत जसप्रीत बुमराह Playing XI मध्ये नकोय; जाणून घ्या कारण 

- डॉम बेसनं ही भागीदारी संपुष्टात आणली. चेतेश्वर पुजारा १४३ चेंडूंत ७३ धावा करून माघारी परतला. पुजारा व रिषभ यांनी ११९ धावांची भागीदारी केली. जो रुटची कमाल; अविश्वसनीय झेल घेत अजिंक्य रहाणेला पाठवलं माघारी, Video  

पाहा विकेट...

Web Title: IND vs ENG, 1st Test : Strange dismissal for Cheteshwar Pujara, lucky for Dominic Bess to register his 3rd wicket, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.