IND vs ENG, 2nd T20 : मुंबई इंडियन्सच्या दोन शिलेदारांचं पदार्पण, टीम इंडियाचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय 

Ind Vs Eng 2nd T20 Match Today : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 06:39 PM2021-03-14T18:39:51+5:302021-03-14T18:42:01+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG, 2nd T20 : India opt to bowl, Suryakumar Yadav and Ishan Kishan replace Shikhar Dhawan and Axar Patel in the XI | IND vs ENG, 2nd T20 : मुंबई इंडियन्सच्या दोन शिलेदारांचं पदार्पण, टीम इंडियाचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय 

IND vs ENG, 2nd T20 : मुंबई इंडियन्सच्या दोन शिलेदारांचं पदार्पण, टीम इंडियाचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ind Vs Eng 2nd T20 Match Today : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. इशान किशन ( Ishan Kishan) आणि सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) हे दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यातून (  Ind Vs Eng 2nd T20 Live Score) पदार्पण करणार आहेत. रोहित शर्माला ( Rohit Sharma) आजही विश्रांती देण्यात आली आहे. शिखर धवन आणि अक्षर पटेल ( Shikhar Dhawan and Axar Patel out) यांना विश्रांती देण्यात आली असून त्यांच्या जागी इशान व सूर्यकुमार या दोन मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी स्थान पटकावले आहे. ( Ishan Kishan and Suryakumar Yadav in). इशान व लोकेश राहुल ही जोडी आज सलामीला उतरणार आहे. ( Ishan will open with KL Rahul)




भारतीय संघ (Playing XI): लोकेश राहुल, इशान किशन, विराट कोहली, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल.



इंग्लंडच्या संघात टॉम कुरणचे पुनरागमन झाले आहे, मार्क वूडला दुखापतीमुळे आजच्या सामन्याला मुकावे लागणार आहे. 
इंग्लंडचा संघ  (Playing XI):  जेसन रॉय, जोस बटलर, डेवीड मलान, जॉनी बेअरस्टो, इयॉन मॉर्गन, बेन स्टोक्स, सॅम कुरन, जोफ्रा आर्चर, टॉम कुरन, ख्रिस जॉर्डन, आदील राशिद 

Web Title: IND vs ENG, 2nd T20 : India opt to bowl, Suryakumar Yadav and Ishan Kishan replace Shikhar Dhawan and Axar Patel in the XI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.