India vs England, 2nd Test : Rishabh Pant अन् बेन फोक्स यांच्यात राडा; भारतीय खेळाडूचा स्ट्राइक घेण्यास नकार, Video

India vs England, 2nd Test; Rishabh Pant refused to take the strike : पहिल्याच दिवशी भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ यानं इंग्लंडच्या बेन फोक्स ( Ben Foakes) याच्यासोबत झालेल्या वादानंतर स्ट्राईक घेण्यास नकार दिला.

By स्वदेश घाणेकर | Published: February 14, 2021 09:01 AM2021-02-14T09:01:26+5:302021-02-14T09:01:51+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG, 2nd Test : Rishabh Pant refuses to take strike after argument with Ben Foakes, Video | India vs England, 2nd Test : Rishabh Pant अन् बेन फोक्स यांच्यात राडा; भारतीय खेळाडूचा स्ट्राइक घेण्यास नकार, Video

India vs England, 2nd Test : Rishabh Pant अन् बेन फोक्स यांच्यात राडा; भारतीय खेळाडूचा स्ट्राइक घेण्यास नकार, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England, 2nd Test : रोहित शर्मा ( १६१) आणि अजिंक्य रहाणे ( ६७) यांच्या फटकेबाजीनं चेन्नई कसोटीचा पहिला दिवस गाजवला. रोहितनं आधी चेतेश्वर पुजारा आणि नंतर अजिंक्य याच्यासोबत केलेल्या भागीदारीनं टीम इंडियाच्या धावांचा पाया रचला. त्या जोरावर टीम इंडियानं पहिल्या दिवशी ६ बाद ३०० धावा केल्या. तिसरे पंच अनिल चौधरी यांच्या दोन वादग्रस्त निर्णयामुळेही पहिला दिवस चर्चेत राहिला. रिषभ पंत ( Rishabh Pant) आणि अक्षर पटेल दिवसअखेर खिंड लढवत आहेत. पण, पहिल्याच दिवशी भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ यानं इंग्लंडच्या बेन फोक्स ( Ben Foakes) याच्यासोबत झालेल्या वादानंतर स्ट्राईक घेण्यास नकार दिला. ( Rishabh Pant refused to take the strike). पहिल्या दिवशी झालेल्या या राड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इंग्लंडच्या संघावर झाला अन्याय, Ajinkya Rahaneला दिलं नाबाद; ग्लेन मॅक्सवेल चिडला!

पहिल्या दिवसाच्या अखेरच्या सत्रातील शेवटच्या षटकांमध्ये हा प्रकार घेतला. डावाच्या ८७व्या षटकात यष्टिंमागून फोक्स सातत्यानं बडबड करत होता आणि त्याच्या या कृतीवर रिषभ नाराज झाला. या दोघांमध्ये शाब्दीक बाचाबाचीही झाली आणि त्यानंतर रिषभनं स्ट्राईक घेण्यास नकार दिला. पंतनं अम्पायरकडे तक्रारही केली. इंग्लडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स यानंही मध्यस्थी केली. पंतच्या या पवित्र्यामुळे सामन्याला विलंब होत होता.  रोहित शर्माचं शतक अन् सोशल मीडियावर चर्चा रितिकाची, Video पाहिल्यावर समजेल कारण!




दरम्यान, ८८व्या षटकानंतर पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. रोहित शर्मानं १६१ धावांची खेळी केली, तर अजिंक्यानं ६७ धावा केल्या. रोहित-अजिंक्य माघारी परतल्यानंतर रिषभनं सामन्याची सूत्र हाती घेत ५६ चेंडूंत ३३ धावा चोपल्या आहेत. दुसऱ्या दिवशी टीम इंडियाला आणखी मोठी धावसंख्या गाठून देण्याचं काम रिषभच्या खांद्यावर असेल.   जे कुणालाच जमलं नाही ते रोहित शर्मानं करून दाखवलं; हा विक्रम कुणाला जमणार पण नाही!

Web Title: IND vs ENG, 2nd Test : Rishabh Pant refuses to take strike after argument with Ben Foakes, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.