Ind vs Eng 3rd Test;  Virat Kohli : घरच्या मैदानावर आता विराट कोहली 'वाघ'; महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडला 

Ind vs Eng 3rd Test Day 2 : Virat Kohli  भारतानं तिसऱ्या कसोटीत अवघ्या दोन दिवसांत पाहुण्या इंग्लंडला पाणी पाजलं. इंग्लंडचा दुसरा डाव ८१ धावांवर गुंडाळल्यानंतर टीम इंडियानं ४९ धावांचे माफक लक्ष्य एकही विकेट न गमावता पार केलं.

By स्वदेश घाणेकर | Published: February 25, 2021 08:22 PM2021-02-25T20:22:01+5:302021-02-25T20:22:35+5:30

whatsapp join usJoin us
Ind vs Eng 3rd Test Day 2 : Virat Kohli surpasses MS Dhoni to become the most successful captain in India | Ind vs Eng 3rd Test;  Virat Kohli : घरच्या मैदानावर आता विराट कोहली 'वाघ'; महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडला 

Ind vs Eng 3rd Test;  Virat Kohli : घरच्या मैदानावर आता विराट कोहली 'वाघ'; महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडला 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ind vs Eng Pink Ball Test :  भारतानं तिसऱ्या कसोटीत अवघ्या दोन दिवसांत पाहुण्या इंग्लंडला पाणी पाजलं. इंग्लंडचा दुसरा डाव ८१ धावांवर गुंडाळल्यानंतर टीम इंडियानं ४९ धावांचे माफक लक्ष्य एकही विकेट न गमावता पार केलं. पहिल्या दिवशी १३ विकेट्स पडल्यानंतर, दुसऱ्या दिवशीही फिरकीपटूंनी कमाल दाखवली. दुसऱ्या दिवशी १७ विकेट्स पडल्या. या विजयासह भारतानं मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. अक्षर पटेलनं ( Axar Patel) सामन्यात ११, तर आर अश्विननं ( R Ashwin) ७ विकेट्स घेतल्या. या विजयासह कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा ( MS Dhoni) विक्रम मोडला. विराट हा घरच्या मैदानावर सर्वाधिक २२ कसोटी जिंकणारा भारतीय कर्णधार ठरला. विराटनं २९ कसोटींपैकी २२ सामने जिंकून धोनीचा २१ कसोटी विजयाचा विक्रम मोडला.  दोन दिवसांत इंग्लंडचा खेळ खल्लास, भारताचा Day-Night कसोटीत दणदणीत विजय


जो रूटनं ( Joe Root) अविश्वसनीय कामगिरी करताना ६.२ षटकांत ८ धावा देत टीम इंडियाचे ५ फलंदाज माघारी पाठवले. त्यामुळे टीम इंडियाचा पहिला डाव १४५ धावांवर गडगडला आणि त्यांना ३३ धावांच्या नाममात्र आघाडीवर समाधान मानावे लागले. रुटनं ६.२ षटकांत ८ धावांत ५ विकेट्स घेतल्या. १९८२नंतर इंग्लंडच्या कर्णधारानं कसोटी क्रिकेटमध्ये केलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.  या विक्रमात गुब्बी अॅलन ( ७-८० वि. भारत, १९३६), आर्थूर गिलिगॅन ( ६-७ वि. दक्षिण आफ्रिका, १९२४) व बॉब विली ( ६-१०१ वि. भारत, १९८२) यांनी हा पराक्रम केला होता. India vs England 3rd Test 


 इंग्लंडचा दुसरा डाव ८१ धावांवर गुंडाळण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं. अक्षर पटेलनं ५ आणि आर अश्विननं ४ विकेटेस घेतल्या. भारताविरुद्धची कसोटी क्रिकेटमधील दुसरी निचांक कामगिरी ठरली. २०१५मध्ये नागपूर कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा संघ ७९ धावांवर माघारी परतला होता. भारतासमोर विजयासाठी ४९ धावांचं माफक लक्ष्य होतं आणि ते त्यांनी सहज पार करून मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली.  घरच्या मैदानावर सर्वाधिक कसोटी विजय मिळवणाऱ्या कर्णधारांमध्ये विराट चौथ्या क्रमांकावर आहे. ग्रॅमी स्मिथ ( ३०), रिकी पाँटिंग ( २९) आणि स्टीव्ह वॉ ( २२) हे आघाडीवर आहेत.  Ind vs Eng Pink Ball Test

 

Web Title: Ind vs Eng 3rd Test Day 2 : Virat Kohli surpasses MS Dhoni to become the most successful captain in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.