IND vs ENG, 3rd Test : भारत-इंग्लंड सामने थांबवा, अन्यथा आत्महत्या करीन; नरेंद्र मोदी स्टेडियमच्या सुरक्षा अधिकाऱ्याला आला फोन अन्...

IND vs ENG, 3rd Test : आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यांत ६५ हजारांहून अधिक प्रेक्षक उपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 03:12 PM2021-03-16T15:12:10+5:302021-03-16T15:12:37+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG, 3rd Test : Man threatens to immolate self if T20 matches continue amid Covid surge, probe initiated | IND vs ENG, 3rd Test : भारत-इंग्लंड सामने थांबवा, अन्यथा आत्महत्या करीन; नरेंद्र मोदी स्टेडियमच्या सुरक्षा अधिकाऱ्याला आला फोन अन्...

IND vs ENG, 3rd Test : भारत-इंग्लंड सामने थांबवा, अन्यथा आत्महत्या करीन; नरेंद्र मोदी स्टेडियमच्या सुरक्षा अधिकाऱ्याला आला फोन अन्...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ind Vs Eng 3rd T20 Live Score : भारत-इंग्लंड यांच्यातला तिसरा ट्वेंटी-20 सामना आज अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर ( Narendra Modi Stadium) होणार आहे. विराट कोहलीच्या ( Virat Kohli) नेतृत्वाखाली टीम इंडियाने ( Team India) दुसरा सामना जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी मिळवली आहे. पण, गुजरात येथील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता उर्वरित तीनही सामने प्रेक्षकांविना खेळवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. तत्पूर्वी, भारत-इंग्लंड क्रिकेट सामने थांबवा अन्यथा आत्महत्या करीन, असा धमकीचा फोन नरेंद्र मोदी स्टेडियमची सुरक्षा पाहणाऱ्या अधिकाऱ्याला आला आणि तपासाची चक्र फिरली. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना क्रिकेट सामने का खेळवता, असा सवालही या व्यक्तीनं केला. (  threatened self-immolation if the upcoming matches were not cancelled ) 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चंजखेडा पोलीस स्थानकात FIR दाखल करण्यात आलं असून धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तिचं नाव पंकज पटेल असे आहे. ती व्यक्ती गांधीनगर येथील आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी के व्ही पटेल यांनी सांगितले की, १२ मार्चचा सामना खेळवला, तर आत्महत्या करीन अशी धमकी व्यक्तिनं दिली होती. के व्ही पटेल हे नरेंद्र मोदी स्टेडियमच्या सुरक्षेची जबाबदारी पाहणाऱ्या तुकडीचे सदस्य आहेत.

पोलीस आणि त्या व्यक्तिंमधील संभाषणाची ऑडीओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यात ती व्यक्ती अधिकाऱ्याला कोरोना व्हायरलच्या नियमांची अंमलबजावणी स्टेडियमवर होत आहे का, असा प्रश्न विचारत आहे. त्यावर अधिकारी सोशल डिस्टन्सींगच्या नियम पाळले जात नसल्याचे सांगतेय. त्यानंतर हा सामना रद्द न केल्यास आत्महत्या करीन असा इशारा देत आहे. या व्यक्तिनं गुजरातच्या मुख्यमंत्र्यांप्रती अपशब्दांचाही वापर केला होता.  पोलिसांनी त्या व्यक्तिविरोधात IPC Sections 505(2) या कलमांतर्गत गुन्हा दाखल केल गेला आहे. त्याव्यतिरिक्त ५०४ व ५०७ कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.  


''१२ मार्चला त्या व्यक्तिनं माझ्याफोनवर कॉल केला आणि जर मॅच खेळवलीत तर आत्महत्या करीन अशी धमकी दिली. त्यानं गुजरात सरकार व मुख्यमंत्र्यांविरुद्ध अपशब्दही वापरले. त्याला मी नाव विचारले, तेव्हा त्यानं पंकज पटेल असे सांगितले. त्यानंतर मी लगेच गांधीनगर पोलीसांना याची माहिती दिली आणि त्या व्यक्तिचा फोन नंबर शेअर केला,''असे के व्ही पटेल यांनी सांगितले. 

Web Title: IND vs ENG, 3rd Test : Man threatens to immolate self if T20 matches continue amid Covid surge, probe initiated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.