India vs England 4th test Live : कालच्या खेळीनंतर रोहित शर्माच्या मांडीची झालेली अशी अवस्था, क्रिकेट चाहत्यांनाच समजू शकतात या वेदना!

भारताकडून दुसऱ्या डावात रोहित शर्मानं १२७  व लोकेश राहुलन ४६ धावा करत चांगली सुरूवात करून दिली. त्यानंतर चेतेश्वर पुजारानं ६१ धावा करताना रोहितला तोलामोलाची साथ दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 10:16 PM2021-09-05T22:16:26+5:302021-09-05T22:17:32+5:30

whatsapp join usJoin us
Ind vs Eng 4th Test 2021 Live updates: Condition of Rohit Sharma legs after yesterday's innings; photo viral | India vs England 4th test Live : कालच्या खेळीनंतर रोहित शर्माच्या मांडीची झालेली अशी अवस्था, क्रिकेट चाहत्यांनाच समजू शकतात या वेदना!

India vs England 4th test Live : कालच्या खेळीनंतर रोहित शर्माच्या मांडीची झालेली अशी अवस्था, क्रिकेट चाहत्यांनाच समजू शकतात या वेदना!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 4th test 2021 cricket match live scorecard updates : शतकवीर रोहित शर्मा व अर्धशतकवीर चेतेश्वर पुजारा हे दोघंही चौथ्या दिवशी मैदानावर क्षेत्ररक्षणाला उतरलेले नाहीत. त्यांच्या ऐवजी मैदानावर सूर्यकुमार यादव आणि मयांक अग्रवाल स्लीपमध्ये उभे राहिलेले दिसत आहेत. बीसीसीआयनंही यामागचं कारण सांगितल आणि ते ऐकून चाहत्यांचं टेंशन वाढलं आहे. इंग्लंडच्या वेगवाना गोलंदाजांचा मार आपल्या मांडीवर झेलून रोहित तिसऱ्या दिवशी टीम इंडियासाठी यजमानांना भिडला. त्याला होणाऱ्या वेदनेची जाणीव करून देणारा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

मोठी घडामोड; रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा मैदानावर नाही उतरले, जाणून घ्या कारण

भारताकडून दुसऱ्या डावात रोहित शर्मानं १२७  व लोकेश राहुलन ४६ धावा करत चांगली सुरूवात करून दिली. त्यानंतर चेतेश्वर पुजारानं ६१ धावा करताना रोहितला तोलामोलाची साथ दिली. विराट कोहलीला पुन्हा एकदा शतकापासून वंचित रहावे लागले असले तरी त्याच्या ४४ धावांच्या खेळीनं टीम इंडियाला मजबूती दिली. चौथ्या दिवशी रिषभ पंत ( ५०) व शार्दूल ठाकूर ( ६०) यांनी सातव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना इंग्लंडच्या गोलंदाजांच्या चेहऱ्यावरील हास्य हिरावून घेतेल. मोईन अलीनं रिषभला बाद करण्याची सोपी संधी गमावल्यानंतर तर इंग्लंडच्या कर्णधार जो रूट यान डोक्यावर हात मारला.

रिषभ पंतला बाद करण्याची चालून आलेली संधी इंग्लंडनं गमावली, मोठी फजिती झाली Video 

भारतीय संघानं चौथ्या कसोटीत निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. रोहित शर्मा व चेतेश्वर पुजारा यांच्या दमदार खेळानंतर विराट कोहली, रिषभ पंत व शार्दूल ठाकूर यांनी ईंगा दाखवला. टीम इंडियानं दुसऱ्या डावात ४६६ धावा करताना इंग्लंडसमोर विजयासाठी ३६८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.  दरम्यान, रोहित शर्माच्या डाव्या गुडघ्यात दुखापत झालीय, तर पुजाराच्या पायाच्या घोटा दुखावला आहे. त्यामुळे त्यांनी विश्रांती घेतली आहे. 


 

Web Title: Ind vs Eng 4th Test 2021 Live updates: Condition of Rohit Sharma legs after yesterday's innings; photo viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.