India vs England 4th test Live : लोकेश राहुलवर आयसीसीची दंडात्मक कारवाई; एक चूक महागात पडली

India vs England 4th test 2021 cricket match live scorecard updates : भारतानं चौथ्या कसोटीत मजबूत आघाडी घेतली आहे. रोहित शर्माचे शतक, चेतेश्वर पुजाराचे अर्धशतक आणि लोकेश राहुल व विराट कोहली यांच्या महत्त्वपूर्ण खेळीच्या जोरावर भारतानं यजमान इंग्लंडला बॅकफूटवर फेकले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 06:28 PM2021-09-05T18:28:55+5:302021-09-05T18:29:29+5:30

whatsapp join usJoin us
Ind vs Eng 4th Test 2021 Live updates: KL Rahul fined for showing dissent towards the umpires | India vs England 4th test Live : लोकेश राहुलवर आयसीसीची दंडात्मक कारवाई; एक चूक महागात पडली

India vs England 4th test Live : लोकेश राहुलवर आयसीसीची दंडात्मक कारवाई; एक चूक महागात पडली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 4th test 2021 cricket match live scorecard updates : भारतानं चौथ्या कसोटीत मजबूत आघाडी घेतली आहे. रोहित शर्माचे शतक, चेतेश्वर पुजाराचे अर्धशतक आणि लोकेश राहुल व विराट कोहली यांच्या महत्त्वपूर्ण खेळीच्या जोरावर भारतानं यजमान इंग्लंडला बॅकफूटवर फेकले आहे. आता रिषभ पंत व शार्दूल ठाकूर दमदार फटकेबाजी करून इंग्लंडची डोकेदुखी वाढवली आहे. पण, आजच्या दिवसाची सुरूवात टीम इंडियाच्या गोटात चिंता वाढवणारी ठरली आहे. भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे चार सदस्यांना विलगिकरणात जावे लागले आहे. त्यात आता लोकेश राहुलवर संकट ओढावलं आहे.

बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर विराट कोहलीनं काढला राग, Photo Viral

लोकेश राहुल व रोहित शर्मा यांनी पहिल्या डावातील पिछाडी भरून काढताना टीम इंडियाला दुसऱ्या डावात ८३ धावांची सलामी दिली. ३९ वर्षीय जेम्स अँडरसननं ही भागीदारी तोडली. लोकेशला ४६ धावांवर माघारी परतला, परंतु बाद दिल्याचा निर्णय त्याला पटलेला नाही. त्याच्या मते त्याची बॅट चेंडूला नव्हे तर पॅडला लागली. त्यामुळे पॅव्हेलियनमध्ये परत जाताना तो नाराज दिसत होता. त्याची हीच नाराजी त्याला महागात पडली. अम्पायरच्या निर्णयाचा अनादर केल्यामुळे लोकेश राहुलाल मॅच फीमधील १५ टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे. ( India opener KL Rahul has been slapped a fine of 15 per cent of his match fees for showing dissent towards the umpires after his dismissal on Day 3 ) 

वी शास्त्री यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, टीम इंडियाचे चार सदस्य विलगिकरणात; 

राहुलनं आयसीसीच्या नियमातील कलम २.८ चे उल्लंघन केले आणि त्यामुळे त्याला दंडात्मक कारवाईसह एक डिमेरीट ( वजा गुण) गुण मिळाले आहेत. मागील २४ महिन्यांतील राहुलनं उल्लंघन केलेली ही पहिलीच घटना आहे.

  

Web Title: Ind vs Eng 4th Test 2021 Live updates: KL Rahul fined for showing dissent towards the umpires

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.