India vs England 4th test 2021 cricket match live scorecard updates : रोहित शर्मा व चेतेश्वर पुजारा यांनी चौथ्या कसोटीच्या तिसरा दिवस खेळून काढताना टीम इंडियाला मजबूत आघाडी मिळवून दिली. पण, ऑली रॉबिन्सननं एकाच षटकात दोघांनी माघारी पाठवून टीम इंडियाला बॅकफूटवर फेकले. कर्णधार विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांच्याकडून मोठी अपेक्षा होती आणि त्यांनी ५९ धावांची भागादारी करून टीम इंडियाच्या आघाडीत भर टाकली. चौथ्या दिवशी विराटनं मोठ्या विक्रमाची नोंद केली, परंतु ख्रिस वोक्सनं दोन मोठे धक्के देऊन इंग्लंडला कमबॅकचे स्वप्न दाखवले. india vs england 4th test, india vs england 4th test live
रोहित शर्मा व चेतेश्वर पुजारा यांनी दुसऱ्या विकेटसाठी २७८ चेंडूंत १५३ धावांची भागीदारी करताना विक्रम केला. रोहित व चेतेश्वर पुजारा एकाच षटकात माघारी रवींद्र जडेजाला पाचव्या क्रमांकावर बढती दिली गेली. पण, अंधुक प्रकाशामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ १३ षटकं आधीच थांबवण्यात आला होता. कर्णधार विराट कोहली व रवींद्र जडेजा खेळपट्टीवर आहेत. विराटनं ३७ चेंडूंत नाबाद २२ धावा केल्या आहेत. भारतानं तिसऱ्या दिवसअखेर ३ बाद २७० धावा करून १७१ धावांची आघाडी घेतली होती. india vs england 4th test live score, india vs england 4th test scorecard
चौथ्या दिवशी पहिल्या अर्ध्यातासाच्या खेळात विराटनं सुरेख फटके मारले. जडेजाही सेट झालाय असे वाटत होते, परंतु वोक्सनं त्याला पायचीत पकडले. जडेजा १७ धावांवर माघारी परतला. अजिंक्य रहाणेही भोपळ्यावर पायचीत झाला. तो मागील २७ कसोटी डावांमध्ये ३ वेळा भोपळ्यावर माघारी परतला, तर दोन अर्धशतकं व एक शतक झळकावलं. india vs england 4th test live udates, ind vs eng live test match
पाहा व्हिडीओ..
विराटनं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पूर्ण केल्या १० हजार धावाया सामन्यापूर्वी विराट कोहलीच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १२७ सामन्यांत ९९२० धावा केल्या होत्या. त्यात ३४ शतकं व ३४ अर्धशतकांचा समावेश होता. पण, या सामन्यात पहिल्या डावात ५० आणि दुसऱ्या डावात ३०वी धाव घेताच त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण केल्या. ind vs eng live score, ind vs eng live score
रवी शास्त्री यांच्यासह टीम इंडियाचे चार सदस्य आयसोलेशनमध्ये
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर बीसीसीआयच्या वैद्यकिय टीमनं गोलंदाज प्रशिक्षक भरत अरूण, क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर श्रीधर आणि फिजिओथेरपिस्ट नितीन पटेल या चौघांना विलगिकरणात राहण्याचा सल्ला दिला आहे. काल रात्री रवी शास्त्री यांची चाचणी झाली आणि त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. या सर्वांची RT-PCR चाचमई केली जाणार आहे आणि तोपर्यंत ही सर्व हॉटेलमध्येच राहतील आणि टीम इंडियासोबत ते प्रवास करणार नाही. भारतीय संघातील अन्य सदस्यांच्या दोन चाचण्या झाल्या. त्यात सर्वांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे आजच्या चौथ्या दिवसाचा खेळ होईल.
Web Title: Ind vs Eng 4th Test 2021 Live updates: Virat Kohli completes 10,000 runs in First Class cricket, india lost rahane and jadeja
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.