IND vs ENG : इंग्लंडला मोठा धक्का; कसोटी मालिका मध्येच सोडून खेळाडू परतला माघारी 

India vs England अहमदाबाद कसोटीत ( Ahmedabad Test) टीम इंडियानं १० विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला आणि मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली.

By स्वदेश घाणेकर | Published: February 27, 2021 10:51 AM2021-02-27T10:51:08+5:302021-02-27T10:51:52+5:30

whatsapp join usJoin us
Ind vs Eng: Chris Woakes flies home from Test tour | IND vs ENG : इंग्लंडला मोठा धक्का; कसोटी मालिका मध्येच सोडून खेळाडू परतला माघारी 

IND vs ENG : इंग्लंडला मोठा धक्का; कसोटी मालिका मध्येच सोडून खेळाडू परतला माघारी 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England Test : पाहुण्या इंग्लंड संघाला तिसऱ्या कसोटीत लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. अहमदाबाद कसोटीत ( Ahmedabad Test) टीम इंडियानं १० विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला आणि मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. या पराभवामुळे इंग्लंडचा आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद ( ICC World Test Championship) स्पर्धेच्या फायनलमधून पत्ता कट झाला. त्यात त्यांना शनिवारी आणखी एक झटका बसला. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस वोक्स ( Chris Woakes ) यानं मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. ४ मार्चपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटीत प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणार नाही, असे संघ व्यवस्थापनानं कळवताच वोक्सनं मायदेशी जाण्याचा निर्णय घेतला.  ख्रिस गेलची पाकिस्तान सुपर लीगमधून माघार; कारण समजल्यावर 'युनिव्हर्स बॉस'चा वाटेल अभिमान

दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका दौऱ्यानंतर इंग्लंडचा संघ भारतात दाखल झाला. या संपूर्ण दौऱ्यांत वोक्स हा पर्यटक म्हणून इंग्लंडच्या संघासोबत आहे. त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेतही तो बाकावर बसून राहिला आणि त्यानंतर कोरोना व्हायरसमुळे वन डे मालिका रद्द झाली. वोक्सला आता भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटी मालिकेतही संधी मिळणार नाही. त्यामुळे एकदाचं बायो बबलमधून बाहेर पडून कुटुंबीयांना भेटावं, यासाठी तो मायदेशी परतला. वोक्ससह जोस बटलर, सॅम कूरन आणि मोईन अली हेही कसोटी मालिकेतून मायदेशी परतले आहेत. IPL 2021 Venues : मुंबईकर यंदा आयपीएलच्या सामन्यांना मुकणार; BCCIने निवडली पाच शहरं, फायनल अहमदाबादमध्ये?

इंग्लंडचा ICC World Test Championship ( जागतिक कसोटी अजिंक्यपद ) स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या स्वप्नांना सुरूंग लागला. आता जेतेपदाच्या सामन्यात न्यूझीलंडचा मुकाबला करण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ शर्यतीत आहेत. भारतानं अहमदाबाद कसोटी ( Ahmedabad Test) जिंकून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतक्त्यात ४९० गुणांसह अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली. भारताच्या विजयाची टक्केवारी ७१% अशी झाली आहे. इंग्लंड ६४.१ टक्क्यांसह चौथ्या क्रमांकावर राहिला आहे. भारताला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील स्थान पक्कं करण्यासाठी चौथ्या कसोटीत विजय मिळवावा लागेल किंवा ती ड्रॉ करावी लागेल. पण, जर इंग्लंडनं हा सामना जिंकला, तर ऑस्ट्रेलियाचे अंतिम सामन्यातील स्थान पक्कं होईल.
 

Web Title: Ind vs Eng: Chris Woakes flies home from Test tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.