ठळक मुद्देइंग्लंडनं पहिल्या कसोटीत २२७ धावांनी मिळवला विजयदुसऱ्या कसोटीला १३ फेब्रुवारीपासून होणार सुरू
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं चेन्नई कसोटीत वापरण्यात आलेल्या एसजी चेंडूवर ( SG Ball) नाराजी व्यक्त केली. त्याच्याआधी फिरकीपटू आर अश्विन ( R Ashwin) यानंही या चेंडूवरून तक्रार केली होती. इंग्लंडकडून चेन्नई कसोटीत पराभव झाल्यानंतर विराटनं एसजी चेंडूच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. भारतीय गोलंदाज चेंडूची हालत पाहून खूश नव्हते आणि त्याला बदलण्याची विनंती अम्पायर नितिन मेनन व अनिल चौधरी यांनी मान्य केली नाही. कोहली म्हणाला,''एसजी चेंडूंची गुणवत्ता घसरली आहे. ६० षटकानंतर चेंडू पूर्णपणे खराब होतो आणि कसोटीत असं व्हायला नको. कोणताच संघ अशी अपेक्षा करत नसावा. पण, हे कारण नाही. इंग्लंडच्या संघानं चांगला खेळ केला आणि ते विजयाचे हकदार आहेत.'' विराट कोहलीची चूक महागात पडणार; २-१ असा विजय मिळवल्यानंतरही टीम इंडियाची WTCची फायनल हुकणार?
मेरठच्या सांसपारेल्स ग्रीनलँड ( SG) कंपनीनं या मालिकेसाठी नवीन चेंडू तयार केल्याची चर्चा आहे. याचा रंग अधिक गडद केला असून त्यानं सिम अधिक करता येणार आहे. पण, गोलंदाज या चेंडूवर नाराज आहेत. अश्विननं ८ फेब्रुवारीला सांगितले होते की,''चेंडू सुंदर आहे, परंतु आमच्यासाठी तो अजब होता. यापूर्वी एसजी चेंडूला सीमनंतर इतकं खराब होताना पाहिले नाही. पहिल्या दोन दिवशी खेळपट्टी टणक असल्यानं असं झालं असावं. पण, दुसऱ्या डावातही ३५-४० षटकानंतर पुन्हा तेच पाहायला मिळाले.''Love Story : 'बार'मध्ये काम करायची जो रुटची पत्नी, लग्नाआधीच इंग्लंडच्या कर्णधार झाला होता बाप!
इंग्लंडचा भारतात सर्वात मोठा विजय; लीच व अँडरसनचा भेदक माराजॅक लीचचा फिरकी मारा व जगातील सर्वाधिक यशस्वी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनची भेदक गोलंदाजी याच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या पाचव्या व शेवटच्या दिवशी मंगळवारी भारताचा २२७ धावांनी पराभव केला आणि चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या विजयासह इंग्लंडने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या विश्व टेस्ट चॅम्पियनशिप तालिकेत अव्वल स्थान पटकावले. या सामन्यापूर्वी इंग्लंड चौथ्या स्थानी होता. या सामन्याच्या निकालामुळे भारताची चौथ्या स्थानी घसरण झाली. इंग्लंडचा हा भारतात सर्वांत मोठा विजय ठरला. लीच (४-७६) व अँडरसन (३-१७) यांच्या भेदक माऱ्यापुढे भारतीय संघाचा दुसरा डाव ४२० धावांच्या विश्वविक्रमी लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार
विराट कोहली व शुभमन गिल (५०) यांच्या अर्धशतकानंतरही ५८.१ षटकांत १९२ धावांत संपुष्टात आला.
अजिंक्य रहाणेसारखा मोठेपणा विराट कोहलीनं दाखवला का?; इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा सवाल
Web Title: IND vs ENG : Virat Kohli, Ravichandran Ashwin Unhappy With SG Ball Used in Chennai Test
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.