IND vs NZ : दुखापतग्रस्त रोहित शर्माच्या जागी मयांक अग्रवालचा वनडे मालिकेसाठी संघात समावेश

न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या टी-20 लढतीदरम्यान पोटरीला झालेली दुखापत बळावल्याने रोहित शर्माला दौऱ्यातून माघार घ्यावी लागली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 08:29 AM2020-02-04T08:29:55+5:302020-02-04T09:34:37+5:30

whatsapp join usJoin us
IND vs NZ : Mayank Agarwal in the ODI squad as Rohit Sharma’s replacement | IND vs NZ : दुखापतग्रस्त रोहित शर्माच्या जागी मयांक अग्रवालचा वनडे मालिकेसाठी संघात समावेश

IND vs NZ : दुखापतग्रस्त रोहित शर्माच्या जागी मयांक अग्रवालचा वनडे मालिकेसाठी संघात समावेश

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई -  न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या टी-20 लढतीदरम्यान पोटरीला झालेली दुखापत बळावल्याने रोहित शर्माला दौऱ्यातून माघार घ्यावी लागली आहे. दरम्यान, रोहित शर्माच्या अनुपस्थितीत सलामीवीर मयांक अग्रवाल याला एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्याच आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आज सकाळी याबाबतची घोषणा केली. 



मयांक अग्रवाल याने आतापर्यंत 9 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. या नऊ सामन्यात त्याने 67.07 च्या सरासरीने 872 धावा फटकावल्या आहेत. यामध्ये तीन शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. मात्र मयांकला अद्याप एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळालेली नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मायदेशातील एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत त्याला राखीव सलामीवीर फलंदाज म्हणून संघात स्थान देण्यात आले होते. 

NZ vs IND : Rohit Sharmaची न्यूझीलंड दौऱ्यातून माघार; हिटमॅनच्या कसोटी कारकिर्दीला मोठा धक्का

मोहम्मद शमीच्या घरी हलला पाळणा, जन्माला आली कन्या!

विराट काढतोय एका चेंडूत दोन विकेट?; लोकेशला यष्टीमागे उभं करण्यामागे 'सिक्रेट गेम'

न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यात वेगाने धाव घेण्याच्या प्रयत्नात रोहितच्या पोटरीचे स्नायू दुखावले गेले होते. त्यानंतरही काही  ४१ चेंडूंमध्ये ६० धावांची खेळी केल्यानंतर रोहित या लढतीतून रिटायर्ड हर्ट झाला होता. त्यानंतर रोहितच्या अनुपस्थितीत लोकेश राहुलने संघाचे नेतृत्व केले होते. दरम्यान सोमवारी करण्यात आलेल्या एमआरआय स्कॅनमधून त्याची दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि कसोटी मालिकेला मुकावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले होते.  

भारत-न्यूझीलंड मालिकेचे वेळापत्रक

वन डे 
भारत विरुद्ध न्यूझीलंड - 5 फेब्रुवारी, सकाळी 7.30 वा.
भारत विरुद्ध न्यूझीलंड - 8 फेब्रुवारी, सकाळी 7.30 वा.
भारत विरुद्ध न्यूझीलंड - 11 फेब्रुवारी, सकाळी 7.30 वा.
    
कसोटी
भारत विरुद्ध न्यूझीलंड - 21 ते 25 फेब्रुवारी, पहाटे 4 वा.
भारत विरुद्ध न्यूझीलंड - 29 फेब्रुवारी ते 4 मार्च, पहाटे 4 वा.

 

Web Title: IND vs NZ : Mayank Agarwal in the ODI squad as Rohit Sharma’s replacement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.