IND vs NZ : टीम इंडियाविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी न्यूझीलंडचा तगडा संघ जाहीर

वर्ल्ड कप स्पर्धेनंतर टीम इंडिया आणि न्यूझीलंड प्रथमच वन डे सामना खेळणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 09:49 AM2020-01-30T09:49:50+5:302020-01-30T09:50:13+5:30

whatsapp join usJoin us
IND vs NZ: New Zealand's strong squad announced for ODI Series against Team India | IND vs NZ : टीम इंडियाविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी न्यूझीलंडचा तगडा संघ जाहीर

IND vs NZ : टीम इंडियाविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी न्यूझीलंडचा तगडा संघ जाहीर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेचा निकाल बुधवारी लागला. पाहुण्या टीम इंडियानं सुपर ओव्हरमध्ये रंगलेल्या तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली. आता उर्वरीत दोन सामने ही केवळ औपचारिकता राहिली आहे. ट्वेंटी-20 मालिकेनंतर उभय संघांमध्ये तीन वन डे सामन्यांची मालिका होणार आहे. ट्वेंटी-20 मालिकेतील पराभव विसरून यजमान वन डे मालिकेत विजय मिळवण्यासाठी नक्की प्रयत्नशील असतील. त्यासाठी त्यांनी गुरुवारी संघ जाहीर केला. या संघात किवींनी नव्या जलदगती गोलंदाजाला संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

न्यूझीलंडनं जाहीर केलेल्या संघात कायले जेमिसन पदार्पण करणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त स्कॉट कुग्गेलइजन आणि हॅमिश बेन्नेट यांचा समावेश करण्यात आला आहे. जेमिसन हा न्यूझीलंड अ संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. लॉकी फर्ग्युसनला वन डे मालिकेला मुकावे लागणार आहे. ट्रेंट बोल्ट आणि मॅट हेन्री हेही दुखापतग्रस्त असल्यानं या मालिकेत खेळणार नाहीत. बेन्नेट आणि कुग्गेलेइजन या दोघांनी 2017मध्ये आयर्लंडविरुद्ध अखेरचा वन डे सामना खेळला होता. 

IND Vs NZ, 3rd T20I : विराट कोहलीनं 'कॅप्टन कूल' धोनीचा विक्रम मोडला, ठरला टीम इंडियाचा अव्वल कर्णधार

IND Vs NZ, 3rd T20I : रोहित शर्माची 'पॉवर'; केला कोणत्याच भारतीयाला न जमलेला पराक्रम

IND Vs NZ, 3rd T20I : रोहित शर्मा दस हजारी मनसबदार; हा शिखर सर करणारा चौथा भारतीय

फिरकीपटू इश सोढी याला केवळ पहिल्या सामन्यासाठी संघात स्थान देण्यात आले आहे. त्यानंतर तो न्यूझीलंड अ संघासह चार दिवसीय सामन्यासाठी भारत अ संघाचा सामना करण्यासाठी जाणार आहे. 

न्यूझीलंडचा संघ - केन विलियम्सन ( कर्णधार), हॅमिश बेन्नेट, टॉम ब्लंडल, कॉलीन डी ग्रँडहोम, मार्टिन गुप्तील, कायले जेमिसन, स्कॉट कुग्गेलेइजन, टॉम लॅथम, जिमी निशॅम, हेन्री निकोल्स, मिचेल सँटनर, इश सोढी ( पहिल्या सामन्यासाठी), टीम साऊदी, रॉस टेलर. 

भारताचा वन डे संघ - विराट कोहली ( कर्णधार), रोहित शर्मा ( उपकर्णधार), पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत ( यष्टिरक्षक), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, केदार जाधव.

वन डे मालिकेचे वेळापत्रक
5 फेब्रुवारी, सकाळी 7.30 वा.
8 फेब्रुवारी, सकाळी 7.30 वा.
11 फेब्रुवारी, सकाळी 7.30 वा.

IND Vs NZ: सुपर ओव्हरवर बंदी आणा, न्यूझीलंडच्या क्रीडा मंत्र्यांनी केली अजब मागणी

    

Web Title: IND vs NZ: New Zealand's strong squad announced for ODI Series against Team India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.