Rishabh Pant नं साधला मोठा डाव; MS धोनीचा विक्रम मोडित काढत ठरला 'नंबर वन'

कसोटी कारकिर्दीतील १२ वे अर्धशतक झळकावत पंतनं खास विक्रमाला गवसणी घातली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 12:55 PM2024-10-19T12:55:04+5:302024-10-19T13:14:40+5:30

whatsapp join usJoin us
IND vs NZ Rishabh Pant Break MS Dhoni Record He Becomes Fastest Indian Wicketkeeper To 2500 Test Runs | Rishabh Pant नं साधला मोठा डाव; MS धोनीचा विक्रम मोडित काढत ठरला 'नंबर वन'

Rishabh Pant नं साधला मोठा डाव; MS धोनीचा विक्रम मोडित काढत ठरला 'नंबर वन'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

न्यूझीलंड विरुद्धच्या बंगळुरु कसोटी सामन्यात धमाकेदार फटकेबाजीसह फिफ्टी साजरी करताना रिषभ पंतनं माजी कर्णधार एमएस धोनीचा मोठा विक्रम मोडित काढला आहे. चौथ्या दिवशी रिषभ पंतनं सर्फराज खानसोबत भारताच्या डाव पुढे नेण्याची जबाबदारी अगदी चोख पार पाडली. कसोटी कारकिर्दीतील १२ वे अर्धशतक झळकावत त्याने खास विक्रमाला गवसणी घातली. अर्धशतकासह पंतन कसोटी क्रिकेटमध्ये २५०० धावांचा पल्ला गाठला आहे.

MS धोनीवर भारी पडला रिषभ पंत

रिषभ पंतनं जलदगतीने २ हजार ५०० धावांचा टप्पा पार करत महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मागे टाकला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलदगतीने हा पल्ला गाठणारा तो भारतीय विकेट किपर बॅटर ठरला आहे. रिषभ पंतनं ६२ व्या डावात हा विक्रमी डाव साधला. धोनीनं यासाठी ६९ वेळा बॅटिंग केली होती.

फक्त ४ भारतीयांनी पार केला आहे हा टप्पा 

कसोटी क्रिकेटमध्ये फक्त ४ विकेट किपर बॅटर आहेत ज्यांनी २५०० धावांचा पल्ला पार केला आहे. यात आता रिषभ पंत अव्वलस्थानावर आहे. त्याच्यापाठोपाठ या यादीत धोनीचा नंबर लागतो. या दोघांशिवाय फारुख इंजिनीयर आणि सैय्यद किरमानी या दिग्गजांचा समावेश आहे. 

कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात जलद २५०० धावांचा पल्ला गाठणारे विकेट किपर बॅटर

  • ६२ - रिषभ पंत (Rishabh Pant)
  • ६९ - महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni)
  • ८२ - फारुख इंजिनीयर (Farokh Engineer)

 

चौथ्या दिवसाच्या खेळात रिषभ पंत आणि सर्फराज खान या जोडीनं शतकी भागीदारीसह न्यूझीलंडच्या गोलंदाजांना टेन्शनमध्ये आणल्याचा सीन पाहायला मिळाला. पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थाबंला त्यावेळी भारतीय संघाच्या धावफलकावर ३ बाद ३४४ धावा लागल्या होत्या. बंगळुरु कसोटी सामन्यात न्यूझीलंड संघाने पहिल्या डावात तब्बल ३५६ धावांची आघाडी घेतली होती. पण भारतीय संघाने दुसऱ्या डावात दिमाखदार खेळ करत ही आघाडी अगदी शुल्लक केली आहे. टीम इंडिया फक्त १२ धावांनी पिछाडीवर आहे.  

सर्वाधिक वेळा ५० पेक्षा अधिक धावा करणाऱ्या भारतीय विकेट किपरच्या यादीत धोनी अव्वल

कसोटी क्रिकेटमध्ये महेंद्रसिंह धोनी हा भारताकडून सर्वाधिक वेळा ५० पेक्षा अधिक धावा करणारा विकेट किपर बॅटर आहे. या विक्रमाच्या बाबतीत रिषभ पंतनं फारुख इंजिनीयर या दिग्गजाची बरोबरी केली आहे. पण पंतनं दिग्गजाच्या तुलनेत अधिक वेगवान आहे. 

  • महेंद्रसिंह धोनीनं १४४ डावात ३९ वेळा केल्या ५० पेक्षा अधिक धावा  
  • रिषभ पंतनं ६२ डावात १८ व्या वेळी केलीये ५० पेक्षा अधिक धावा
  • फारुख इंजिनीयर यांनी ८७ डावात १८ वेळा साधला ५० पेक्षा अधिक धावा करण्याचा डाव
  • सय्यद किरमानी यांनी १२४ डावात १४ वेळा केलीये अशी कामगिरी

Web Title: IND vs NZ Rishabh Pant Break MS Dhoni Record He Becomes Fastest Indian Wicketkeeper To 2500 Test Runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.