IND vs SA Match Hilarious Seen After Ryan Rickelton Long Six :डरबन येथील किंग्समीड स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात भारतीय संघाने दमदार विजयाची नोंद केली. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या डावात एक विचित्र घडना घडल्याचे पाहायला मिळाले. दक्षिण आफ्रिकेच्या एका नागरिकाने चक्क सुरक्षा रक्षकांच्या डोळ्या देखत त्यानं मॅच बॉल आपल्या खिशात घालून नेल्याचा सीन पाहायला मिळाला.
अन् सुरक्षा रक्षकांच्या समोर रस्त्यावरच्या नागरिकांना मारला चेंडूवर डल्ला
दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीवेळी रायन रिकलटन (Ryan Rickelton) याने एक उत्तुंग षटकार मारल्याचे पाहायला मिळाले. त्याने मारलेला चेंडू १०४ मीटर लांब अंतरावर स्टेडियमबाहेरील रस्त्यावर जाऊन पडला. यावेळी रस्त्याने चाललेल्या आफ्रिकन नागरिकानं तो चेंडू उचलून तिथून पळ काढला. सुरक्षा रक्षकांनी चेंडू या नागरिकाच्या हाती गेल्यावर फक्त बघ्याची भूमिकाच निभावली.
लांब षटकारापेक्षा चेंडू लाबंवणाऱ्या व्यक्तीची रंगली चर्चा; इथं पाहा व्हिडिओ
दक्षिण आफ्रिकेच्या डावातील चौथ्या षटकात हा सर्व प्रकार घडला. भारताकडून जलदगती गोलंदाज आवेश खान गोलंदाजी करत होता. या षटकातील शेवटच्या चेंडूवर रायन रिकलटन (Ryan Rickelton) याने उत्तुंग फटका मारला. त्याने मारलेला चेंडू डरबन स्टेडियमबाहेरील रस्तावर पडला. दक्षिण आफ्रिकेच्या बॅटरनं मारलेल्या १०४ मीटर लांब षटकारापेक्षा चेंडू रस्त्यावर पडल्यावर तो ढापणाऱ्या आफ्रिकन नागरिकाचा व्हिडिओ चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसतोय.
पॉवर प्लेमध्येच संपली दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील सलामीवीराची ताकद
रायन रिकलटन मारलेला फटका पाहून दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील हा गडी टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरणार असेच संकेत मिळाले होते. पण त्याची फटकेबाजी जास्त काळ टिकली नाही. पॉवर प्लेमधील अखेरच्या आणि सहाव्या षटकात सूर्यकुमार यादवनं वरुण चक्रवर्तीच्या हाती चेंडू सोपला. मिस्ट्री स्पिनरनं दुसऱ्याच चेंडूवर त्याला तंबूचा रस्ता दाखवला. तिलक वर्मानं त्याचा झेल टिपला.
Web Title: IND vs SA Match Hilarious Seen After Ryan Rickelton Long Six African citizen headlines He took the match ball with him that landed on the streets Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.