IND vs SA: रोहित शर्मानं का खाल्लं मैदानावरचं गवत? झाला खुलासा! 13 वर्षांपूर्वी 'या' दिग्गज खेळाडूनंही असंच केलं होतं

Rohit sharma eat pitch grass : रोहित शर्माचा मैदानावरील गवत खातानाचा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. रोहितने असे का केले असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 07:21 PM2024-06-30T19:21:15+5:302024-06-30T19:22:54+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SA Why did Rohit Sharma eat pitch grass while celebrated after won t20 world cup 13 years ago, legendary player novak djokovic also did the same | IND vs SA: रोहित शर्मानं का खाल्लं मैदानावरचं गवत? झाला खुलासा! 13 वर्षांपूर्वी 'या' दिग्गज खेळाडूनंही असंच केलं होतं

IND vs SA: रोहित शर्मानं का खाल्लं मैदानावरचं गवत? झाला खुलासा! 13 वर्षांपूर्वी 'या' दिग्गज खेळाडूनंही असंच केलं होतं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावल्यानंतर रोहित शर्माला अत्यंत भावूक झाला होता. त्याच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. सहकारी खेळाडूंनी त्याचे सांत्वन केले. यानंतर रोहित पत्नी रितिका आणि मुलगी समायरा यांना भेटण्यासाठी इंडियन डगआउटमध्ये गेला. यानंतर तो तिथून बार्बाडोसच्या खेळपट्टीवर गेला आणि खेळपट्टीवर गवत खाताना दिसला.

रोहित शर्माचा मैदानावरील गवत खातानाचा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. रोहितने असे का केले असा प्रश्न अनेकांना पडला आहे. खरे तर, आयसीसी ट्रॉफी जिंकणे हे रोहित शर्माचे स्वप्न होते. भारतीय संघ गेल्या वर्षात दोनवेळा अंतिम सामन्यात पराभूत झाला होता. ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये आणि वनडे वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताचा पराभव केला होता. मात्र, भारताने टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर आनंद साजराकरत,  रोहितने नोव्हाक जोकोविच प्रमाणे खेळपट्टीवरील गवत खाल्ले.

नोव्हाक जोकोविच अशा पद्धतीने साजरा करतो आनंद - 
यापूर्वी, सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने विम्बल्डनमध्ये राफेल नदालचा पराभव केला होता. यानंतर तो टेनिस कोर्टवरील गवत खाताना दिसला होता. 13 वर्षांपूर्वी SW19 मध्ये राफेल नदालविरुद्धच्या विजयानंतर आनंद साजरा करताना जोकोविचने पहिल्यांदा असे केले होते. यानंतर त्याने 8 वेळा अशा पद्धतीने आनंद साजरा केला.

मुलाखतीत केला होता असा खुलासा - 
नोव्हाक 2018 मध्ये एका मुलाखतीत म्हणाला होता, ही नक्कीच एक छोटीशी परंपरा आहे. मी लहान असताना विम्बल्डन जिंकण्याचे स्वप्न पाहिले होते. जेव्हा तुम्ही तुमचे स्वप्न साध्य करता, तेव्हा तुम्हाला आनंद साजरा करण्यासाठी काहीतरी वेगळे करावेसे वाटते आणि हे त्यापैकी एक होते. आता असे मानले जाते की, रोहित शर्मानेही नोव्हाकला कॉपी करत अशा पद्धतीने आनंद साजरा केला. आपली आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची इच्छा आहे, असे रोहित शर्मानेही मुलाखतींमध्ये अनेक वेळा म्हटले आहे. 

रोहितचे हे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर, त्याने आनंद साजरा करताना खेळपट्टीवरील गवत खाल्ले आणि या विजयासाठी मैदानाचीही कृतज्ञता व्यक्त केली. महत्वाचे म्हणजे, या विजयानंतर, रोहित शर्मा आणि विराट कोहलीने टी-20 इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली आहे
 

Web Title: IND vs SA Why did Rohit Sharma eat pitch grass while celebrated after won t20 world cup 13 years ago, legendary player novak djokovic also did the same

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.