IND vs SL: T20मध्ये आता विराट-रोहित नाही, श्रीलंकेविरूद्ध सलामीवीर कोण? 'या' ३ नावांची चर्चा

Team India Openers, IND vs SL: २७ जुलैपासून भारत-श्रीलंका टी२० मालिकेला होणार सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 01:19 PM2024-07-24T13:19:48+5:302024-07-24T13:20:32+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SL Virat Kohli Rohit Sharma retired from T20 these 3 options for team India Openers against Sri Lanka T20 Series | IND vs SL: T20मध्ये आता विराट-रोहित नाही, श्रीलंकेविरूद्ध सलामीवीर कोण? 'या' ३ नावांची चर्चा

IND vs SL: T20मध्ये आता विराट-रोहित नाही, श्रीलंकेविरूद्ध सलामीवीर कोण? 'या' ३ नावांची चर्चा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Team India Openers, IND vs SL: भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ टी२० सामन्यांची मालिका आणि त्यानंतर ३ वन डे सामन्यांची मालिका खेळण्यात येणार आहे. भारतीय संघ २७ जुलैपासून या दौऱ्याला सुरुवात करेल आणि आधी टी२० मालिकेला सुरुवात होईल. भारत आणि श्रीलंका यांच्यात ३ सामन्यांची टी२० मालिका खेळवली संध्याकाळी ७ वाजता पल्लेकल येथील मैदानावर खेळवली जाणार आहे. भारताचे वर्ल्डकपमधील सलामीवीर रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही टी२०तून निवृत्त झाल्यानंतर आता श्रीलंका मालिकेत सलामीवीर कोण, याबाबत चर्चा रंगली आहे.

BCCI ने टी२० संघाचे कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे सोपवले आहे. तसेच या दौऱ्यासह गौतम गंभीरही आपल्या प्रशिक्षकपदाची कारकिर्द सुरु करणार आहे. या मालिकेत विराट आणि रोहित नसल्याने त्यांच्याजागी शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वाल ही जोडी सलामीला येईल हे जवळपास निश्चित आहेत. या दौऱ्यासाठी जाहीर झालेल्या संघात दोनच बॅक-अप सलामीवीर नसल्याने जर या दोघांपैकी एक जण दुखापतग्रस्त झाल्यास रिषभ पंतदेखील सलामी करू शकतो असे म्हटले जात आहे.

भारताचा टी२० संघ- सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, रिषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.

दरम्यान, श्रीलंका क्रिकेट निवड समितीनेही टी२० मालिका खेळण्यासाठी १६ खेळाडूंच्या संघाची निवड केली. क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री हरिन फर्नांडो यांनी या संघाला काल मान्यता दिली. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या महिष तिक्षणा, मथिशा पाथिराना, नुवान तुषारा यासारख्या अनेक स्टार्सचा या संघात समावेश करण्यात आला आहे.

भारताविरुद्ध श्रीलंकेचा संघ- चरिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल परेरा, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चंडीमल, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, महिश तिक्षणा, चामिंदू विक्रमसिंगे, मथिशा पाथिराना, नुवान थुसारा, दुनिथ वेल्लालागे, दुश्मंता चामिरा, बिनुरा फर्नांडो

Web Title: IND vs SL Virat Kohli Rohit Sharma retired from T20 these 3 options for team India Openers against Sri Lanka T20 Series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.