ठळक मुद्दे१८ जूनपासून भारतीय संघ WTC Finalमध्ये न्यूझीलंडचा सामना करणार आहे४ ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला होणार सुरूवातभारतीय महिला संघ १ कसोटी, तीन वन डे व तीन ट्वेंटी-२० सामने खेळणार
India Tour of England : भारताचा पुरुष व महिला क्रिकेट संघ बुधवारी लंडन दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. या दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या खेळाडू व सपोर्ट स्टाफच्या कुटुंबीयांनाही दौऱ्यावर जाण्यास लंडन सरकारनं परवानगी दिली आहे. पुरुष क्रिकेट संघाचा दौरा जवळपास चार महिने चालणार आहे. या दौऱ्यावर भारतीय पुरुष संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल आणि इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. महिला संघ या दौऱ्यावर एक कसोटी, तीन वन डे व तीन ट्वेंटी-२० सामने खेळणार आहे. ( families of Indian players and coaching and support staff have been cleared by the UK government )
पुरूष व महिला संघासाठीच्या चार्टर्ड फ्लाईटमधूनच त्यांचे कुटुंबीयही लंडन दौऱ्यावर रवाना होतील आणि ३ जूनला ते लंडनमध्ये दाखल होतील. त्यानंतर खेळाडू साऊदॅम्प्टन येथे जातील आणि तेथे पुन्हा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करतील. त्यानंतर भारतीय महिला संघ ब्रिस्टोल येथे जाईल. तेथे एकमेव कसोटी सामना खेळला जाणार आहे. भारतीय पुरुष संघ एजीस बॉल येथे सराव करेल. सध्या दोन्ही संघ मुंबईतील हॉटेलमध्ये क्वारंटाईन आहेत.
दरम्यान, इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाला दिलासा मिळाला. इंग्लिश क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) केवळ तीन दिवसांचा क्वारंटाईन कालावधी ठेवण्याचा बीसीसीआयचा प्रस्ताव मान्य केला. यामुळे २ जून रोजी इंग्लंडकडे रवाना होणारे भारतीय खेळाडू तीन दिवस क्वारंटाईन राहिल्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याआधी किमान १२ दिवस सराव करू शकतील.
याआधी ईसीबीने भारतीय खेळाडूंना किमान दहा दिवस क्वारंटाईन होण्याची अट ठेवली होती. या अटीनुसार १२ जूनला क्वारंटाईन कालावधी संपणार होता. त्यामुळे केवळ सहा दिवसांचा कालावधी सरावासाठी मिळू शकला असता. १८ जूनपासून साऊदम्पटनच्या रोझ बाऊलमध्ये अंतिम सामना होणार आहे.
ऑस्ट्रेलिया मॉडेल
मागच्या वर्षी आयपीएलनंतर नोव्हेंबरमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला त्यावेळीही तीन दिवस क्वारंटाईनचा नियम पाळण्यात आला. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी सराव केला. शिवाय आपसात सराव सामनेही खेळले. हाॅटेलमध्ये मात्र खेळाडू खोलीबाहेर पडू शकत नव्हते. याच मॉडेलबाबत बीसीसीआयने ईसीबीला विनंती केली. चांगल्या सरावाच्या बळावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत केले होते.
भारताचा इंग्लंड दौरा
दिनांक कसोटी संघ
१८ ते २२ जून डब्ल्ययूटीसी न्यूझीलंड
४ ते ८ ऑगस्ट पहिली इंग्लंड
१२ ते १६ ऑगस्ट दुसरी इंग्लंड
२५ ते २९ ऑगस्ट तिसरी इंग्लंड
२ ते ६ सप्टेंबर चौथी इंग्लंड
१० ते १४ सप्टेंबर पाचवी इंग्लंड
महिलांचा इंग्लंड दौरा
सामना दिनांक स्थळ
कसोटी १६ ते १९ जून ब्रिस्टल
पहिला वनडे २७ जून ब्रिस्टल
दुसरा वनडे ३० जून टॉन्टन
तिसरा वनडे ३ जुलै वॉर्सेस्टर
पहिला टी-२० ९ जुलै नॉर्थम्पटन
दुसरा टी-२० ११ जुलै होव
तिसरा टी-२० १५ जुलै चेम्सफोर्ड
Web Title: India Tour of England : Anushka Sharma to join Virat Kohli on UK tour as Team India gets clearance for families' travel
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.