India vs Australia, 2nd ODI : विराट कोहलीच्या नावावर विक्रम, आतापर्यंत केवळ ८ भारतीयांनी केलाय पराक्रम

टीम इंडियाला पहिल्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियानं पराभवाचा दणका दिला. ३७४ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला ६६ धावा कमी पडल्या आणि ऑस्ट्रेलियानं तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: November 29, 2020 09:39 AM2020-11-29T09:39:37+5:302020-11-29T09:41:09+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia, 2nd ODI : Virat Kohli becomes the ninth Indian to reach the milestone of 250 ODIs  | India vs Australia, 2nd ODI : विराट कोहलीच्या नावावर विक्रम, आतापर्यंत केवळ ८ भारतीयांनी केलाय पराक्रम

India vs Australia, 2nd ODI : विराट कोहलीच्या नावावर विक्रम, आतापर्यंत केवळ ८ भारतीयांनी केलाय पराक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देभारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या वन डे सामन्यात यजमानांची प्रथम फलंदाजीभारतीय संघात एकही बदल नाही, ऑस्ट्रेलियानं केला एक बदलसचिन तेंडुलकर, सौरव गांगुली यांच्या पंक्तित स्थान

India vs Australia, 2nd ODI : सलामीच्या सामन्यात लय मिळविण्यासाठी संघर्ष करणाऱ्या भारतीय संघापुढे दुसऱ्या वन डेत ऑस्ट्रेलियावर विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधण्याचे आव्हान आहे. त्यासाठी चुकांपासून बोध घेत विजयासाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी करावी लागेल. पहिली लढत भारताने ६६ धावांनी गमावली. ऑस्ट्रेलियाने भारताच्या कमकुवतपणाचा जो लाभ घेतला तो पाहता कोच रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांचे डोळे उघडले असावेत.  दुसऱ्या वन डे सामन्यातही नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूनं लागला. ऑसी कर्णधार अॅरोन फिंचनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी मैदानावर उतरलेल्या विराट कोहलीनं ( Virat Kohli) एका विक्रमाला गवसणी घातली. 

टीम इंडियाला पहिल्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियानं पराभवाचा दणका दिला. ३७४ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला ६६ धावा कमी पडल्या आणि ऑस्ट्रेलियानं तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाच्या ६ बाद ३७४ धावांचा पाठलाग करणाऱ्या टीम इंडियाला ८ बाद ३०८ धावाच करता आल्या. त्यामुळे दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया संघात बदल करेल असे अपेक्षित होते, परंतु विराटनं तोच संघ कायम राखला. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला दुखापतीचा फटका बसला आणि मार्कस स्टॉयनिसला आजच्या सामन्याला मुकावे लागले. त्याच्या जागी संघात मोइजेस हेनरिक्सला संधी मिळाली.

भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, मयांक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी 

ऑस्ट्रेलिया : ॲरोन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, स्टीव स्मिथ, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल,  ॲलेक्स केरी, पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, अॅडम झम्पा, जोश हेजलवुड, मोइजेस हेनरिक्स

विराट कोहलीचा २५०वा वन डे सामना
विराट कोहलीचा आजचा हा २५०वा आंतरराष्ट्रीय वन डे सामना आहे. २५० वन डे सामना खेळणारा तो नववा भारतीय खेळाडू ठरला. सचिन तेंडुलकर ( ४६३ सामने), महेंद्रसिंग धोनी ( ३५०), राहुल द्रविड ( ३४४), मोहम्मद अझरुद्दीन ( ३३४), सौरव गांगुली ( ३११), युवराज सिंग ( ३०४), अनिल कुंबळे ( २७१) आणि वीरेंद्र सेहवाग ( २५१) यांनी ही कामगिरी केली आहे. 

 

Web Title: India vs Australia, 2nd ODI : Virat Kohli becomes the ninth Indian to reach the milestone of 250 ODIs 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.