India vs Australia, 3rd Test Day 5 : ऑस्ट्रेलियाच्या ४०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाच्या पाचव्या दिवसाची सुरुवात काही चांगली झाली नाही. कर्णधार अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) नॅथन लियॉनच्या गोलंदाजीवर माघारी परतला. टीम इंडियासाठी हा मोठा धक्काचा होता, पण फलंदाजीच्या क्रमवारीत बढती मिळालेल्या रिषभ पंतनं ( Rishabh Pant) सामन्याचे चित्र बदललं. त्यानं आक्रमक खेळ करताना टीम इंडियाला पहिल्या सत्रात १०८ धावा करून दिल्या. भारतानं लंच ब्रेकपर्यंत ३ बाद २०६ धावा केल्या. भारताच्या या कामगिरीनंतर सोशल मीडियावर रिकी पाँटिंग ( Ricky Ponting ) ट्रोल होऊ लागला आहे.
२ बाद ९८ धावांवरून पाचव्या दिवसाची सुरुवात करताना टीम इंडियासमोर ३०९ धावा बनवा किंवा सामना अनिर्णीत राखण्यासाठी प्रयत्न करा, हे दोनच पर्याय आहेत. त्यामुळे अजिंक्य व चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) यांचा सामना अनिर्णिीत राखण्यावर अधिक भर असेल, हे निश्चित होते. पण, नॅथन लियॉयननं धावसंख्येत चार धावांची भर घातल्यानंतर टीम इंडियाला धक्का दिला. अजिंक्य ४ धावांवर माघारी परतला. त्यानंतर हनुमा विहारीला न पाठवता रिषभ पंतला बढती देण्यात आली. त्याचा फायदा संघाला पहिल्या सत्रात झाला.
रिषभनं जोरदार फटकेबाजी केली. ऑसी कर्णधार टीम पेन यानं त्याला दोन जीवदान दिले. रिषभ हा टीम इंडियाच्या सध्याच्या अंतिम ११मध्ये चौथ्या डावात शतक झळकावण्याचा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज आहे आणि आजही त्याच्याकडून तशीच अपेक्षा आहे. रिषभनं अर्धशतक पूर्ण केले. लंच ब्रेकपर्यंत टीम इंडियानं ३ बाद २०६ धावा केल्या आहेत. रिषभ ७३ आणि पुजारा ४१ धावांवर खेळत आहेत. भारतानं २०० धावांचा पल्ला पार केल्यावर पाँटिंग ट्रोल होऊ लागला.
सामन्याच्या चौथ्या दिवशी पाँटिंगनं टीम इंडिया दुसऱ्या डावात दोनशे धावाही करणार नाही, असा दावा केला होता आणि त्यामुळे आता त्याला नेटिझन्सच्या ट्रोलचा सामना करावा लागत आहे.
Web Title: India vs Australia, 3rd Test Day 5 : "India Won't Make 200 In Second Innings," Says Ricky Ponting, netizans trolled him
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.