India vs Australia, 3rd Test : सिडनी कसोटीचा चौथा दिवस गाजला तो ऑस्ट्रेलियन फॅन्सच्या वर्णद्वेषी शेरेबाजीमुळे.. ICCनंही या प्रकरणाची गंभीर दखल घेताना चौकशीचे आदेश दिले. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं घडलेल्या प्रकाराबद्दल टीम इंडियाची माफी मागितली. मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj) सीमारेषेनजीक क्षेत्ररक्षणासाठी उभा असताना काही ऑसी फॅन्सनी त्याच्यावर वर्णद्वेषी शेरेबाजी केली. त्यानंतर सिराजनं त्वरित मैदानावरील अम्पायर्सकडे तक्रार केली आणि त्या हुल्लडबाज प्रेक्षकांवर कारवाई होईपर्यंत अजिंक्य रहाणेनं ( Ajinkya Rahane) सामना थांबवून ठेवला. पण, या प्रेक्षकांनी नेमकी काय शेरेबाजी केली, याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियानंही प्रसिद्धी पत्रक काढून घडलेल्या प्रकाराबद्दल टीम इंडियाची माफी मागितली. या प्रकरणावर महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) प्रतिक्रिया दिली आहे. क्रिकेट कधीही भेदभाव शिकवत नाही, असे मत त्यानं व्यक्त केलं.
क्रिकेट कधीही भेदभाव शिकवत नाही - सचिन तेंडुलकर
सचिन तेंडुलकरनं ट्विट केलं की,''खेळ म्हणजे सर्वांना एकत्र आणणे, लोकांमध्ये फूट पाडणे नाही. क्रिकेट कधीही भेदभाव शिकवत नाही. बॅट आणि बॉल यांना केवळ खेळाडूमधलं टॅलेंट समजतं.. त्याच्या धर्म, रंग, जात आणि राष्ट्रीयत्वाशी काहीच संबंध नसतो. ज्यांना हे समजत नाही, त्यांच्यासाठी स्टेडियममध्ये जागा नाही.''
भारतीय खेळाडूंवरील वर्णद्वेषी शेरेबाजाची ICCकडून दखल; अहवाल मागवला
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीत सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंना वर्णद्वेषी शेरेबाजीचा सामना करावा लागला. या घटनेच्या चौकशीचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. याशिवाय क्रिकेट ऑस्ट्रेलियादेखील घटनेचा समांतर तपास करणार आहे. भारतीय खेळाडूंना प्रेक्षकांनी दिलेल्या वागणुकीबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (आयसीसी) नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणाच्या कारवाईचा अहवाल आयसीसीनं मागवला आहे.
विराट कोहलीनंही ( Virat Kohli) सिडनी कसोटीत घडलेल्या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यानं ट्विट केलं की,''वर्णद्वेषी टीकेचा कधीच स्विकार केला जाणार नाही. सीमारेषेवर अशा अनेक घटनांचा सामना करावा लागला आहे. ही रावडी वागणूक आहे. मैदानावर घडणाऱ्या अशा घटनांचं दुःख वाटतं. या घटनेचा गांभीर्यानं आणि लगेच तपास करायला हवा. दोषींवर कठोर कारवाई करायला हवी.''
Web Title: India vs Australia, 3rd Test : Mohammed Siraj allegedly referred to as ‘Brown Dog’ by Australian fans at SCG, Video Viral
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.