India vs England, 1st Test : चूका किती करणार?; रिषभ पंतकडून स्टम्पिंगचा सोपा चान्स चुकला अन्...

India vs England, 1st Test Day 3 : इंग्लंडचा कर्णधार जो रूटनं ( Joe Root) पहिल्याच कसोटीत भारतीय गोलंदाजांना हतबल केलं.

By स्वदेश घाणेकर | Published: February 7, 2021 10:12 AM2021-02-07T10:12:16+5:302021-02-07T12:32:58+5:30

whatsapp join usJoin us
India vs England, 1st Test Day 3 : Rishabh Pant misses a stumping chance, but England: 578 all out | India vs England, 1st Test : चूका किती करणार?; रिषभ पंतकडून स्टम्पिंगचा सोपा चान्स चुकला अन्...

India vs England, 1st Test : चूका किती करणार?; रिषभ पंतकडून स्टम्पिंगचा सोपा चान्स चुकला अन्...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देजसप्रीत बुमराह व आर अश्विन यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. इशांत शर्मा व शाहबाज नदीम यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले. इंग्लंडच्या संघानं १९०.१ षटकं खेळली.

India vs England, 1st Test Day 3 : जो रुटच्या ( Joe Root) फटकेबाजीच्या जोरावर इंग्लंडनं पहिल्या कसोटीत धावांचा डोंगर उभा केला आहे. चेन्नई कसोटीत भारतीय खेळाडूंकडून चुकांवर चुका झाल्या आणि त्याचा पुरेपूर फायदा इंग्लंड खेळाडूंनी उचलला. दुसऱ्या दिवसाच्या ८ बाद ५५५ धावांवरून इंग्लंडनं तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू केला. नवीन चेंडू घेताच जसप्रीत बुमराहनं ( Jasprit Bumrah) भारताला विकेट मिळवून दिली, त्यानंतर आलेला जेम्स अँडरसनही लगेच माघारी परतला असता, परंतु यष्टिरक्षक रिषभ पंतनं ( Rishabh Pant) त्याचा यष्टिचीत करण्याची सोपी संधी गमावली.  Sad News : वेस्ट इंडिजच्या दिग्गज खेळाडूचे निधन; सायकल चालवत असताना कारनं दिली जोरात धडक

इंग्लंडचा कर्णधार जो रूटनं ( Joe Root) पहिल्याच कसोटीत भारतीय गोलंदाजांना हतबल केलं. भारत दौऱ्यावर ( India vs England 1st Test) येण्यापूर्वी इंग्लंडनं श्रीलंकेचा दौरा केला आणि तेथेही दोन कसोटी सामन्यांत रुटनं २२८ व १८६ धावांची खेळी केली. तोच फॉर्म चेन्नई कसोटीत ( Chennai Test) कायम राखताना रुटनं ३७७ चेंडूंत १९ चौकार व २ षटकारांसह २१८ धावा कुटल्या. शाहबाज नदीमला त्याची विकेट घेण्यात यश मिळालं. जड़ से उखाड़ देंगे Root ko! अमिताभ बच्चन यांच्या 'त्या' ट्विटला अँड्य्रू फ्लिंटॉफचे भन्नाट उत्तर

भारतीय कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) तीनही DRS चुकीचा निर्णय घेऊन गमावल्याचा फटका बसला. भारताने पहिल्या डावातील सर्व DRS दुसऱ्या सत्रातच गमावले होते. त्यात दोन झेल सुटले व एक सोपा रन आऊटही भारतीय क्षेत्ररक्षकांना करता आला नाही. रोहित शर्मानंही एक सोपा झेल सोडला. या सामन्यात रिषभ पंत यष्टिंमागे मनोरंजन करताना दिसला, परंतु त्याच्याकडून चुकाही झाल्या. पहिल्याच दिवशी दुसऱ्याच षटकात त्याच्याकडून झेल सुटला अन् आज तिसऱ्या दिवशी स्टम्पिंग... Video : मोहम्मद सिराजनं रागात धरला कुलदीप यादवचा गळा; BCCIकडे कारवाईची मागणी


इंग्लंडच्या ४ ते ८ क्रमांकाच्या प्रत्येक फलंदाजानं ३०+ धावा केल्या. भारतात भारताविरुद्ध प्रतिस्पर्धी संघानं हे असं तिसऱ्यांदा केलं. यापूर्वी १९४८ मध्ये दिल्ली कसोटीत वेस्ट इंडिजनं, तर २००५मध्ये मोहाली कसोटीत पाकिस्ताननं हा पराक्रम केला.  

इंग्लंडचा पहिला डाव ५७८ धावांवर गुंडाळण्यात टीम इंडियाला यश आलं. इंग्लंडच्या तळाच्या दोन विकेट्सनं ५३ धावा जोडल्या. जसप्रीत बुमराह व आर अश्विन यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. इशांत शर्मा व शाहबाज नदीम यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले. इंग्लंडच्या संघानं १९०.१ षटकं खेळली. यापूर्वी २००९मध्ये भारतीय गोलंदाजांना श्रीलंकेविरुद्धच्या अहमदाबाद कसोटीत २०२.४ षटकं फेकावी लागली होती.
 

Web Title: India vs England, 1st Test Day 3 : Rishabh Pant misses a stumping chance, but England: 578 all out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.