India vs England 2nd Test : शेवटी अनुभवच कामी आला, अजिंक्य रहाणे-चेतेश्वर पुजारा जोडीनं रचला इतिहास; टीम इंडियाकडे मजबूत आघाडी!

India vs England 2nd Test Live, India vs England 2nd Test : भारत-इंग्लंड लॉर्ड्स कसोटी रंजक वळणावर आली आहे. इंग्लंडच्या वर्चस्वाला अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा या अनुभवी फलंदाजांनी सुरूंग लावताना टीम इंडियाची मजबूत आघाडीच्या दिशेनं वाटचाल करून दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 10:37 PM2021-08-15T22:37:56+5:302021-08-15T22:40:02+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 2nd Test : Ajinkya Rahane & Cheteshwar Pujara 100 runs partnership rebuild Team India,Stumps on Day 4 - India lead by 154 runs  | India vs England 2nd Test : शेवटी अनुभवच कामी आला, अजिंक्य रहाणे-चेतेश्वर पुजारा जोडीनं रचला इतिहास; टीम इंडियाकडे मजबूत आघाडी!

India vs England 2nd Test : शेवटी अनुभवच कामी आला, अजिंक्य रहाणे-चेतेश्वर पुजारा जोडीनं रचला इतिहास; टीम इंडियाकडे मजबूत आघाडी!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देलॉर्ड्सवरील चौथ्या विकेट्ससाठीची सर्वोत्तम भागीदारीचा भारतीय जोडीचा विक्रम आधी ८३ - काँट्रॅक्टर/घोरपडे, १९५९, ७१ - अझरुद्दीन/वेंगसरकर, १९८६ व ५९ - गांगुली/ कार्तिक, २००७ यांच्या नावावर होता. २०१७नंतर अजिंक्य व पुजारा यांच्यातील ही पहिलीच शतकी भागीदारी

India vs England 2nd Test Live, India vs England 2nd Test : भारत-इंग्लंड लॉर्ड्स कसोटी रंजक वळणावर आली आहे. इंग्लंडच्या वर्चस्वाला अजिंक्य रहाणेचेतेश्वर पुजारा या अनुभवी फलंदाजांनी सुरूंग लावताना टीम इंडियाची मजबूत आघाडीच्या दिशेनं वाटचाल करून दिली. रहाणे व पुजाराच्या अपयशावर टीकेचे बाण चालवणारे आजच्या खेळीनंतर कौतुकाच्या फुलांचा वर्षाव करताना दिसले. लॉर्ड्सच्या मैदानावर कसोटीत भारताच्या चौथ्या क्रमांकाच्या जोडीला आतापर्यंत शतकी भागीदारी करता आली नव्हती. पण, रहाणे-पुजारा जोडीनं हाही विक्रम केला अन् १९५९नंतरची ही भारताची सर्वोत्तम भागीदारी ठरली. पण, हे सेट फलंदाज बाद झाले अन् टीम इंडियावर पुन्हा प्रेशर निर्माण झाला आहे. पाचव्या दिवशी रवींद्र जडेजाची फिरकी निर्णायक ठरणार आहे. Ind vs End 2nd test match live

अजिंक्य रहाणे-चेतेश्वर पुजारा यांनी रचला इतिहास, १९५९नंतर लॉर्ड्सवर भारतीय जोडीनं केला विक्रम खास!

इंग्लंडनं घेतलेल्या २७ धावांच्या माफक आघाडीच्या प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाचे ३ फलंदाज ५५ धावांवर माघारी परतले होते. अशात फॉर्मात नसलेली अजिंक्य रहाणेचेतेश्वर पुजारा ही जोडी मैदानावर होती. त्यांचा फॉर्म पाहता त्यांच्याकडून कोणी आशाही ठेवल्या नव्हत्या, परंतु टीम इंडियाच्या मदतीला ही अनुभवी जोडीच धावून आली. संयम, फटक्यांमध्ये नजाकत अन् प्रचंड एकाग्रता... या दोघांचा परतलेला फॉर्म पाहून भारतीय चाहते आनंदात होते. कर्णधार विराट कोहलीच्या पडलेल्या चेहऱ्यावरही हसू उमटले अन् तोही ड्रेसिंग रुममधून बाहेर येत लॉर्ड्सच्या बालकनीवर येऊन बसला. India vs England 2nd Test Live, India vs England 2nd Test

चिटर...?; इंग्लंडच्या गोलंदाजांनी चेंडू कुरतडण्यासाठी लढवली शक्कल, स्टुअर्ट ब्रॉडचा बचाव!


लोकेश राहुल ( ५), रोहित शर्मा ( २१) व विराट ( २०) माघारी परतल्यानंतर अजिंक्य-पुजारा जोडीनं टीम इंडियाला सावरले. सुरुवातीला संयमी खेळ करून त्यांनी खेळपट्टीवर ठाण मांडला. स्थिरावल्यानंतर जोखमीचे फटके मारण्याचं टाळून गॅपमधून ही जोडी चौकार जमवताना दिसली. अजिंक्यला अर्धशतक पूर्ण करण्यासाठी १२५ चेंडूंचा सामना करावा लागला अन् १५ ऑगस्टला कसोटीत अर्धशतक करणारा महेंद्रसिंग धोनीनंतर तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला. या जोडीनं २९७ चेंडू म्हणजेच जवळपास ५० षटकं खेळून काढली अन् १०० धावांची भागीदारी केली. लॉर्ड्स कसोटीत सर्वाधिक २९७ चेंडूंचा सामना करण्याचा विक्रमही या जोडीनं नावावर केला ( Most balls faced in a Lord's Test match). यापूर्वी लोकेश राहुल व रोहित शर्मा यांनी याच कसोटीत २६२ चेंडू , तर विराट कोहली व लोकेशनं २०८ चेंडू खेळली होती.   Ind vs Eng 2nd Test live, Eng vs ind 2nd test live score

विराट कोहलीनं जेम्स अँडरसनला दिली शिवी, स्टुअर्ट ब्रॉडनं सडेतोड उत्तर दिले!


मार्क वूडनं त्यांच्या भागीदारीला ब्रेक लावला. पुजारा २०६ चेंडूंत केवळ ४ चौकारांसह ४५ धावा करून माघारी परतला. दोन षटकांनंतर मोईन अलीच्या गोलंदाजीवर कट मारण्याच्या प्रयत्नात अजिंक्य झेलबाद झाला. त्यानं १४६ चेंडूंत ५ चौकारांसह ६१ धावा केल्या.  लॉर्ड्सवरील चौथ्या विकेट्ससाठीची सर्वोत्तम भागीदारीचा भारतीय जोडीचा विक्रम आधी ८३ - काँट्रॅक्टर/घोरपडे, १९५९, ७१ - अझरुद्दीन/वेंगसरकर, १९८६ व ५९ - गांगुली/ कार्तिक, २००७ यांच्या नावावर होता. २०१७नंतर अजिंक्य व पुजारा यांच्यातील ही पहिलीच शतकी भागीदारी ठरली. मोईन अलीनं टीम इंडियाला आणखी एक धक्का देताना रवींद्र जडेजाचा ( ३) त्रिफळा उडवला. Eng vs Ind 2nd test live score board

चौथ्या दिवस अखेर भारतानं ६ बाद १८१ धावा करताना १५४ धावांची आघाडी घेतली आहे. खराब विद्युत प्रकाशामुळे चौथ्या दिवसांचा खेळ ८ षटकं आधीच थांबवण्यात आला. रिषभ १४ धावांवर खेळत आहे. 

Web Title: India vs England 2nd Test : Ajinkya Rahane & Cheteshwar Pujara 100 runs partnership rebuild Team India,Stumps on Day 4 - India lead by 154 runs 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.