India vs England 2021 2nd test match live cricket score : जो रुट आणि जॉनी बेअरस्टो यांनी लॉर्ड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचे पहिले सत्र गाजवले. या दोघांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांना एकही यश मिळवू न देता संघाच्या धावसंख्येत भर घातली. ३ बाद ११९ धावांवरून आजच्या खेळाची सुरुवात करणाऱ्या इंग्लंडनं लंच ब्रेक पर्यंत ३ बाद २१६ धावा केल्या. रूट व बेअरस्टो यांनी १०८ धावांची नाबाद भागीदारी केली आहे. इंग्लंड फ्रंटसिटवर असूनही त्यांच्या चाहत्यांकडून रडिचा डाव खेळला जात आहे. शतकवीर लोकेश राहुल सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना इंग्लंडच्या चाहत्यांनी त्याच्यावर वाईन बॉटल्सचं लाकडी बूच फेकून मारले. त्यामुळे लोकेश नाराज दिसला. कर्णधार विराट कोहलीला जेव्हा हे समजलं तेव्हा त्यानं तिच बूच उचलून चाहत्यांना मारण्याचा इशारा लोकेशला केला... India vs England 2nd Test Live, India vs England 2nd Test
भारताच्या पहिल्या डावातील ३६४ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला धक्के बसले, परंतु रूट खचला नाही आणि त्यानं दमदार खेळ केला. पण, या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी लंच ब्रेकमध्ये खेळाडूंसाठी ठेवलेल्या मेन्यूवरीन चाहते भडकलेले पाहायला मिळाले. रोरी बर्न्स-रूट यांनी १६४ चेंडूंत ८५ धावांची भागीदारी करून इंग्लंडचा डाव सावरला, परंतु बर्न्स १३६ चेंडूंत ७ चौकारांसह ४९ धावांवर पायचीत झाला. लॉर्ड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचे पहिले सत्र इंग्लंडच्या नावावर राहिले. Ind vs Eng 2nd Test live, Eng vs ind 2nd test live score
रूट व जॉनी बेअरस्टो यांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. गोलंदाजांना फारशी मदत न मिळणाऱ्या खेळपट्टीवर रूट व बेअरस्टो सहजतेनं धावा करत होते. २०१६नंतर रूट व बेअरस्टो यांनी सहावेळा कसोटीत शतकी भागीदारी केली. रूटपाठोपाठ बेअरस्टोनंही अर्धशतक झळकावून इंग्लंडचा धावफलक हलता ठेवला. लंच ब्रेकपर्यंत इंग्लंडनं ३ बाद २१६ धावा केल्या आहेत. रूट ८९ आणि बेअरस्टो ५१ धावांवर खेळत आहेत. Eng vs Ind 2nd test live score board, Ind vs End 2nd test match live
बघा नेमकं काय घडलं...
Web Title: India vs England 2nd Test : Crowd threw Wine bottle corks on the ground where KL Rahul is standing, watch virat Kohli reaction
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.