India vs England 2nd Test : विराट कोहलीनं जेम्स अँडरसनला दिली शिवी, स्टुअर्ट ब्रॉडनं सडेतोड उत्तर दिले!

India vs England 2021 2nd test match live cricket score : लॉर्ड्स कसोटीच्या चौथ्या दिवसावर यजमान इंग्लंडला वर्चस्व कायम राखण्यात यश आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 08:07 PM2021-08-15T20:07:38+5:302021-08-15T20:10:08+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 2nd Test : ‘This isn’t your fu**ing backyard’ – Virat Kohli and James Anderson verbal spat, strong response from Stuart Broad | India vs England 2nd Test : विराट कोहलीनं जेम्स अँडरसनला दिली शिवी, स्टुअर्ट ब्रॉडनं सडेतोड उत्तर दिले!

India vs England 2nd Test : विराट कोहलीनं जेम्स अँडरसनला दिली शिवी, स्टुअर्ट ब्रॉडनं सडेतोड उत्तर दिले!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 2021 2nd test match live cricket score : लॉर्ड्स कसोटीच्या चौथ्या दिवसावर यजमान इंग्लंडला वर्चस्व कायम राखण्यात यश आले आहे. रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि विराट कोहली हे तीन प्रमुख फलंदाज इंग्लंडच्या गोलंदाजांनी माघारी पाठवले आहेत. चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे आता सामना अनिर्णित राखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. भारत-इंग्लंड कसोटीच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाचा कर्णधार विराटनं इंग्लंडचा प्रमुख गोलंदाज जेम्स अँडरसन याला शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विराटच्या या कृतीवर स्टुअर्ट ब्रॉड यानं सडेतोड उत्तर दिले. ब्रॉड दुखापतीमुळे या सामन्याला मुकला आहे. 

इंग्लंडच्या गोलंदाजांची चिटींग?; चेंडू कुडतडण्याचा प्रयत्न झाला कॅमेरात कैद, फोटो व्हायरल!

२०१४च्या इंग्लंड दौऱ्यावर अँडरसननं वर्चस्व गाजवताना कोहलीला बाद केले होते, परंतु २०१८च्या दौऱ्यावर कोहलीनं कमबॅक केले. त्यानं ५ कसोटींत ५९३ धावा केल्या होत्या. पण, २०२१च्या या दौऱ्यावर अँडरसननं पहिल्या कसोटीत कोहलीला बाद केले. दुसऱ्या कसोटीत त्याला कोहलीची विकेट घेता आली नाही, पण कोहलीनं त्याला डिवचले.  

पाहा व्हिडीओ... 



अँडरसनला डिवचल्यानंतर सहकारी स्टुअर्ट ब्रॉड याला राग आला अन् त्यानं ट्विट केलं. तो म्हणाला,''लॉर्ड्सच्या हॉनर्स बोर्डावर अँडरसनचं नाव लिहिलं गेलं आहे आणि त्यावरून हे त्याचं घरचंच मैदान म्हणावं लागेल. शाब्दिक चकमक आवडली, परंतु त्यासाठी वापरण्यात आलेल्या शब्दांमुळे विराट अडचणीत येऊ शकतो.'' 


 
इंग्लंडचा पहिला डाव ३९१ धावांवर संपुष्टात आला. शमी दोन, इशांत शर्मा तीन आणि सिराजने चार विकेट्स घेतल्या. जो रूट ३२१ चेंडूंत १८ चौकारांसह १८० धावांवर नाबाद राहिला. लॉर्ड्स कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. दोन्ही सलामीवीर धावफलकावर २७ धावा असताना माघारी परतले. लोकेश राहुल ३० चेंडूंत ५ धावांवर बाद झाला. त्यानंतर १२व्या षटकात रोहित ( २१) बाद झाला. अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. या दोघांनी सावध खेळ करताना सामना अनिर्णीत राखण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत  

Web Title: India vs England 2nd Test : ‘This isn’t your fu**ing backyard’ – Virat Kohli and James Anderson verbal spat, strong response from Stuart Broad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.