ठळक मुद्देलोकेशनं २५० चेंडूंत १२ चौकार व १ षटकार खेचून १२९ धावांवर माघारी परतला. त्यानंतर अजिंक्य रहाणेला ( १) जेम्स अँडरसननं पुढील षटकाच्या पहिल्याच चेंडूवर माघारी पाठवले.
India vs England 2021 2nd test match live cricket score : लॉर्ड्स कसोटीचा पहिला दिवस लोकेश राहुल व रोहित शर्मा यांनी गाजवताना इंग्लंडला बॅकफूटवर फेकले. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी लोकेश दमदार खेळ करून अनेक विक्रम मोडेल, असे वाटत होते अन् दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या चेंडूवर दोन धावा घेत त्यानं तसे संकेतही दिले. पण, पुढच्याच चेंडूवर कव्हरवर फटका मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला अन् इंग्लंडच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. ऑली रॉबिन्सननं ही विकेट मिळवून दिली. लोकेशनं २५० चेंडूंत १२ चौकार व १ षटकार खेचून १२९ धावांवर माघारी परतला. त्यानंतर अजिंक्य रहाणेला ( १) जेम्स अँडरसननं पुढील षटकाच्या पहिल्याच चेंडूवर माघारी पाठवले. भारताचा निम्मा संघ २८२ धावांत माघारी परतला आहे. India vs England 2nd Test Live, India vs England 2nd Test
नाणेफेक जिंकून इंग्लंडचा कर्णधार जो रूटनं जेव्हा प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, तेव्हाच विराटच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसला. रोहित व लोकेश यांनी संयमानं खेळ करताना इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. रोहित १४५ चेंडूंत ११ चौकार व १ षटकार खेचून ८३ धावांवर माघारी परतला आणि रोहित-लोकेश यांची भागीदारी १२६ धावांवर संपुष्टात आली. त्यानंतर लोकेश व कर्णधार विराट कोहली यांनी दमदार खेळ केला. पण, पहिल्या दिवसाचा शेवट जसा अपेक्षित होता, तसा झाला नाही. विराटचा फॉर्म परतलाय असे डोळ्यासमोर दिसत असताना दिवसातील अखेरच्या सहाव्या षटकात ऑली रॉबिन्सन यानं त्याला बाद केलं. लोकेश - विराट जोडीनं २०८ चेंडूंत ११७ धावा जोडल्या. Ind vs Eng 2nd Test live, Eng vs ind 2nd test live score
विराट १०३ चेंडूंत ३ चौकारांसह ४२ धावांवर माघारी परतला. पुन्हा एकदा विराटच्या ७१व्या आंतरराष्ट्रीय शतकासाठी चाहत्यांना प्रतीक्षा करावी लागेल. लोकेश व अजिंक्य रहाणे यांनी टीम इंडियाचा आणखी एक धक्का बसू दिला नाही. लोकेश २४८ चेंडूंत १२ चौकार व १ षटकारासह १२७ धावांवर नाबाद राहिला, अजिंक्यही १ धावांवर खेळत आहे. भारतानं पहिल्या दिवशी ३ बाद २७६ धावा केल्या होत्या. Ind vs Eng 2nd Test live, Eng vs ind 2nd test live score
Web Title: India vs England 2nd Test Live Cricket Score : KL Rahul and Ajinkya Rahane out on first 7 balls of the 2nd day
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.