India vs England 2nd Test : लंडनमध्ये डौलानं फडकला तिरंगा; भारतीय संघानं साजरा केला ७५ वा स्वातंत्र्य दिन, Video 

 India vs England 2021 2nd test match live cricket score : देशभरात आज ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचा (Celebration 15th Auguest 2021) उत्साह पाहायला मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 03:55 PM2021-08-15T15:55:10+5:302021-08-15T15:55:45+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 2nd Test Live Score : Indian cricket team hoisting Flag at London on the Independence day, Watch Video | India vs England 2nd Test : लंडनमध्ये डौलानं फडकला तिरंगा; भारतीय संघानं साजरा केला ७५ वा स्वातंत्र्य दिन, Video 

India vs England 2nd Test : लंडनमध्ये डौलानं फडकला तिरंगा; भारतीय संघानं साजरा केला ७५ वा स्वातंत्र्य दिन, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

 India vs England 2021 2nd test match live cricket score : देशभरात आज ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचा (Celebration 15th Auguest 2021) उत्साह पाहायला मिळत आहे. भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे आणि कसोटी मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्सवर खेळवला जात आहे. भारतीय संघानं आज सकाळी लंडनमध्ये स्वातंत्र्य दिवस साजरा केला. कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी भारतीय खेळाडूंसह त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. 

Fact Check : विराट कोहलीची निवृत्तीची घोषणा?; महेंद्रसिंग धोनीसारखीच १५ ऑगस्टची केली निवड!

लॉर्ड्स कसोटीचा आज चौथा दिवस आहे आणि भारताच्या ३६४ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडनं पहिल्या डावात ३९१ धावा करताना २७ धावांची आघाडी घेतली आहे. कर्णधार जो रूट १८० धावांवर नाबाद राहिला. आज चौथ्या दिवशी भारताच्या फलंदाजांची कसोटी आहे. चौथ्या दिवसावर पावसाचं संकट दिसत असल्यानं इंग्लंडच्या गोलंदाजांना फायदा मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. रोहित शर्मा व लोकेश राहुल यांनी सुरेख फटके मारून टीम इंडियाच्या दुसऱ्या डावाची सुरुवात चांगली केली आहे. 

३०,००० रुपये दिवसाचं भाडं, दुबईतील आलिशान हॉटेलमध्ये थांबलेत CSKचे खेळाडू; पाहा Photo

 

Web Title: India vs England 2nd Test Live Score : Indian cricket team hoisting Flag at London on the Independence day, Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.