India vs England 2nd Test : शांत स्वभावाच्या जसप्रीत बुमराहचा पारा चढला, इंग्लंडकडून रडीचा डाव सुरू झाला

India vs England 2nd Test Live, India vs England 2nd Test : भारत-इंग्लंड लॉर्ड्स कसोटी रंजक वळणावर आली आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 04:44 PM2021-08-16T16:44:53+5:302021-08-16T17:04:49+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 2nd Test Live Score : Jos Buttler And Mark Wood started sledging and verbals with Jasprit Bumrah | India vs England 2nd Test : शांत स्वभावाच्या जसप्रीत बुमराहचा पारा चढला, इंग्लंडकडून रडीचा डाव सुरू झाला

India vs England 2nd Test : शांत स्वभावाच्या जसप्रीत बुमराहचा पारा चढला, इंग्लंडकडून रडीचा डाव सुरू झाला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 2nd Test Live, India vs England 2nd Test : भारत-इंग्लंड लॉर्ड्स कसोटी रंजक वळणावर आली आहे. अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा या अनुभवी फलंदाजांनी संयमी खेळ करताना चौथ्या दिवशी टीम इंडियाला कमबॅक करून दिले, परंतु अखेरच्या सत्रात ही दोघंही माघारी परतली. त्यानंतर रवींद्र जडेजाची बाद झाला. पाचव्या दिवशी रिषभ पंतकडून मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु त्याही फोल ठरल्या. जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांनी खिंड लढवताना टीम इंडियाची आघाडी २०० पार नेली. आत्मविश्वासानं फलंदाजी करणाऱ्या जसप्रीतला डिवचण्याचा रडीचा डाव इंग्लंडकडून खेळला गेला अन् शांत स्वभावाच्या भारतीय गोलंदाजाचा पारा चढला... 

मी काय हवेशी बोलतोय?; विराट कोहलीचा पारा चढला, लॉर्ड्सच्या बालकनीतून रिषभ पंतवर चिडला, Video


 इंग्लंडनं घेतलेल्या २७ धावांच्या माफक आघाडीच्या प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाचे ३ फलंदाज ५५ धावांवर माघारी परतले होते.  लोकेश राहुल ( ५), रोहित शर्मा ( २१) व विराट ( २०) माघारी परतल्यानंतर अजिंक्य-पुजारा जोडीनं टीम इंडियाला सावरले.  या जोडीनं २९७ चेंडूंत  १०० धावांची भागीदारी केली. मार्क वूडनं त्यांच्या भागीदारीला ब्रेक लावला. पुजारा २०६ चेंडूंत केवळ ४ चौकारांसह ४५ धावा करून माघारी परतला. दोन षटकांनंतर मोईन अलीच्या गोलंदाजीवर कट मारण्याच्या प्रयत्नात अजिंक्य झेलबाद झाला. त्यानं १४६ चेंडूंत ५ चौकारांसह ६१ धावा केल्या.  

मोईन अलीनं टीम इंडियाला आणखी एक धक्का देताना रवींद्र जडेजाचा ( ३) त्रिफळा उडवला. चौथ्या दिवस अखेर भारतानं ६ बाद १८१ धावा करताना १५४ धावांची आघाडी घेतली होती. खराब विद्युत प्रकाशामुळे चौथ्या दिवसांचा खेळ ८ षटकं आधीच थांबवण्यात आला. रिषभ १४ धावांवर खेळत होता. पाचव्या दिवशी त्याला वैयक्तिक धावांत ८ धावांची भर घालता आली. ऑली रॉबिन्सननं त्याची विकेट काढली. बुमराह व शमी खिंड लढवत आहेत आणि त्यांची एकाग्रता तोडण्यासाठी मार्क वूड व जोस बटलर यांनी बुमराहसोबत स्लेजिंग सुरू केलं.. त्यानंतर बुमराहचा पारा चढला..

 

Web Title: India vs England 2nd Test Live Score : Jos Buttler And Mark Wood started sledging and verbals with Jasprit Bumrah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.