India vs England, 3rd Test : १२ तासात टीम इंडियानं असा इतिहास घडविला जो १०० वर्षांत कुणाला जमला नव्हता

India vs England, 3rd Test : या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी ७ तासांचा खेळ झाला आणि त्यात इंग्लंडचा संघ ११२ धावांवर गडगडला व भारतानं ९९ धावांत ३ विकेट्स गमावले. दुसऱ्या दिवशी अवघ्या साडेपाच तासांत निकाल लागला.

By स्वदेश घाणेकर | Published: February 26, 2021 10:28 AM2021-02-26T10:28:34+5:302021-02-26T10:30:17+5:30

whatsapp join usJoin us
India vs England, 3rd Test : India's win equals record for the shortest Test match ever in terms of days played | India vs England, 3rd Test : १२ तासात टीम इंडियानं असा इतिहास घडविला जो १०० वर्षांत कुणाला जमला नव्हता

India vs England, 3rd Test : १२ तासात टीम इंडियानं असा इतिहास घडविला जो १०० वर्षांत कुणाला जमला नव्हता

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England, 3rd Test : विराट कोहलीच्या ( Virat Kohli) नेतृत्वाखाली टीम इंडियानं अवघ्या दोन दिवसांत अहमदाबाद कसोटी ( Ahmedabad Test) जिंकून इतिहास घडविला. भारत-इंग्लंड डे नाइट कसोटीत ( Day Night Test) यजमान भारतानं १० विकेट्स राखून सहज विजय मिळवला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात २२वेळा दोन दिवसांत निकाल लागले आहेत. अहमदाबाद कसोटीपूर्वी २१ वेळा सामन्याचा निकाल दोन दिवसांत लागला होता, परंतु भारतासाठी १२ तासांत विजय मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे.  नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडियानं रचला इतिहास; नोंदवले १० मोठे विक्रम  

या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी ७ तासांचा खेळ झाला आणि त्यात इंग्लंडचा संघ ११२ धावांवर गडगडला व भारतानं ९९ धावांत ३ विकेट्स गमावले. दुसऱ्या दिवशी अवघ्या साडेपाच तासांत निकाल लागला. भारताचा पहिला डाव १४५ धावांवर संपुष्टात आल्यानंतर इंग्लंडचा दुसऱ्या डावात ८१ धावाच करता आल्या. भारतानं ४९ धावांचे लक्ष्य एकही विकेट न गमावता पार केले. अशा प्रकारे जवळपास १२ तासांत या सामन्यात टीम इंडियानं विजय मिळवला आणि मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली.  अक्षर पटेलची जगातल्या तगड्या गोलंदाजांना टक्कर, नरेंद्र मोदी स्टेडियमवर नोंदवला विश्वविक्रम

१९२१ मध्ये म्हणजे १०० वर्षांनंतर इंग्लंडचा संघाला प्रथमच कसोटी सामन्यांत दोन दिवसांत पराभवाचे तोंड पाहावे लागले. १९२१मध्ये ऑस्ट्रेलियाकडून त्यांना हार मानावी लागली होती. २०००मध्येही इंग्लंडच्या कसोटी सामन्याचा निकाल दोन दिवसांत लागला होता, परंतु तेव्हा त्यांनी वेस्ट इंडिजवर विजय मिळवला होता. कसोटी क्रिकेट इतिहासातील हा सातवा सर्वात लहान कसोटी सामना ठरला.  भारत-इंग्लंड यांच्यातल्या तिसऱ्या कसोटीचा निकाल हा ८४२ चेंडूंत लागला. १९३५ नंतर हा सर्वात कमी चेंडूत लागलेला निकाल आहे. १९३५मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड या कसोटीचा निकाल ६७२ चेंडूत लागला होता. 
 

Web Title: India vs England, 3rd Test : India's win equals record for the shortest Test match ever in terms of days played

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.