India vs England 3rd Test Live : जेवढं लढू शकत होतो, तेवढं लढलो, पण...; विराट कोहलीनं पराभवाचं खरं कारण सागितलं!

india vs England 2021 3rd test match live cricket score : लॉर्ड्स पराभवानंतर इंग्लंडचा संघ आणखी जोमानं मैदानावर उतरला. बेन स्टोक्स. जोफ्रा आर्चर, मार्क वूड, स्टुअर्ट ब्रॉड हे प्रमुख खेळाडू नसूनही इंग्लंडनं तिसऱ्या कसोटीत निर्विवाद वर्चस्व गावजलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 05:59 PM2021-08-28T17:59:17+5:302021-08-28T17:59:45+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 3rd Test Live Cricket Score : No regrets on toss, it was good to bat on but England bowling was relentless, Say Virat Kohli | India vs England 3rd Test Live : जेवढं लढू शकत होतो, तेवढं लढलो, पण...; विराट कोहलीनं पराभवाचं खरं कारण सागितलं!

India vs England 3rd Test Live : जेवढं लढू शकत होतो, तेवढं लढलो, पण...; विराट कोहलीनं पराभवाचं खरं कारण सागितलं!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्दे२ बाद २१५ धावांवरून टीम इंडियाची घसरगुंडी सुरू झाली. भारताचे ८ फलंदाज ६३ धावांवर माघारी परतले. इंग्लंडनं एक डाव ७६ धावांनी विजय मिळवून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली.

india vs England 2021 3rd test match live cricket score : लॉर्ड्स पराभवानंतर इंग्लंडचा संघ आणखी जोमानं मैदानावर उतरला. बेन स्टोक्स. जोफ्रा आर्चर, मार्क वूड, स्टुअर्ट ब्रॉड हे प्रमुख खेळाडू नसूनही इंग्लंडनं तिसऱ्या कसोटीत निर्विवाद वर्चस्व गावजलं. इंग्लंडच्या गोलंदाजांनी टीम इंडियाचा पहिला डाव ७८ धावांवर गुंडाळला. कर्णधार जो रूटनं सलग तिसरं शतक झळकावून टीम इंडियाचा बॅक सिटवर ढकलले. ३५४ धावांची पिछाडी भरून इंग्लंडसमोर लक्ष्य ठेवणे अशक्यच होते, तरीही भारतीय चाहते कोणत्यातरी चमत्काराची प्रतीक्षा करत होते. पण, त्यांच्या इच्छेप्रमाणे काहीच झाले नाही. इंग्लंडनं एक डाव व ७६ धावांनी कसोटी जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. 

१०० मिनिटांत टीम इंडियाचा खेळ खल्लास, ६३ धावांत ८ फलंदाज तंबूत अन् इंग्लंडचा मोठा विजय!

रोहित शर्मा ( ५९) व चेतेश्वर पुजारा यांनी टीम इंडियाच्या चाहत्यांना आशेचा किरण दाखवला. रोहित दुर्दैवीरित्या बाद झाला. पण, पुजारा व कर्णधार विराट कोहली या जोडीनं तिसऱ्या दिवसाच्या अखेरपर्यंत खिंड लवढून दिलासादायक कामगिरी केली. चौथ्या दिवशी नव्या चेंडूने इंग्लंडच्या गोलंदाजांनी कमाल करून दाखवली. पुजाराला एकही धावेची भर न घातला ९१ धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर विराटही ५५ धावांवर बाद झाला अन् २ बाद २१५ धावांवरून टीम इंडियाची घसरगुंडी सुरू झाली. भारताचे ८ फलंदाज ६३ धावांवर माघारी परतले. इंग्लंडनं एक डाव ७६ धावांनी विजय मिळवून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. ( From 215 for 2 to 278 for 10 - lost 8 wickets for just 63 runs within 100 minutes ) 


ऑली रॉबिन्सननं ६५ धावांत ५ विकेट्स घेतल्या, तर क्रेग ओव्हरटर्ननं तीन बळी टिपले. जेम्स अँडरसन व मोइन अली यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. लिड्स कसोटीत पहिल्या डावात टीम इंडियाचे ८ फलंदाज ३० षटकांत ५७ धावांत माघारी परतले होते आणि दुसऱ्या डावात १६.१ षटकांत ६३ धावांत ८ विकेट्स पडल्या.  India vs England 3rd Test Live, India vs England 3rd Test, Ind vs Eng 3rd Test live


या पराभवानंतर विराट कोहली म्हणाला,''पहिल्या डावातील धावसंख्येमुळे दडपण निर्माण झाले होते. तुम्ही जेव्हा ८० धावांच्या आत गडगडता तेव्हा प्रतिस्पर्धींना मोठी आघाडी घेण्याची संधी देता. पण, आम्ही काल चांगला खेळ केला होत, जेवढं लढू शकतो तेवढं लढलो. परंतु इंग्लंडच्या गोलंदाजांनी आज अप्रतिम गोलंदाजी करून दडपण वाढवलं अन् त्यांना हवा तो निकाल लावला. खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक असेल असे आम्हाला वाटले, परंतु इंग्लंडच्या गोलंदाजांच्या शिस्तबद्ध गोलंदाजीनं आम्हाला चुका करण्यास भाग पाडले.''


''नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी घेतली याचे शल्य नाही. इंग्लंडच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली, कारण आम्ही चांगली गोलंदाजी करू शकलो नाही. त्याचाच परिणाम सामन्यावर झाला. मधल्या फळीनं पुन्हा अपयशाचा पाढा गिरवला. अजूनही मालिका गमावलेली नाही. दोन सामने आहेत आणि आम्ही कमबॅक करू,''असा विश्वासही विराटनं व्यक्त केला. 

Web Title: India vs England 3rd Test Live Cricket Score : No regrets on toss, it was good to bat on but England bowling was relentless, Say Virat Kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.