India vs England 3rd Test Live : रोहित शर्मा बाद होताच जार्व्हो फलंदाजीला मैदानावर उतरला अन् घोळच झाला, Video

india vs England 2021 3rd test match live cricket score : लिड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या फलंदाजांनी वर्चस्व गाजवलेलं पाहायला मिळालं.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 10:13 PM2021-08-27T22:13:54+5:302021-08-27T22:17:51+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 3rd Test Live Cricket Score : Team India fan Jarvo breaches security again, walks out to bat after Rohit Sharma's dismissal, Video | India vs England 3rd Test Live : रोहित शर्मा बाद होताच जार्व्हो फलंदाजीला मैदानावर उतरला अन् घोळच झाला, Video

India vs England 3rd Test Live : रोहित शर्मा बाद होताच जार्व्हो फलंदाजीला मैदानावर उतरला अन् घोळच झाला, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

india vs England 2021 3rd test match live cricket score : लिड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या फलंदाजांनी वर्चस्व गाजवलेलं पाहायला मिळालं. कोणतीच घाई न करता संयमानं खेळ करत भारतीय संघानी इंग्लंडला उत्तर दिले आहे. रोहित शर्माचेतेश्वर पुजारा यांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावून भारताच्या धावसंख्येत भर घातली. पण, रोहित शर्मा दुर्दैवीरित्या बाद झाला आणि त्यानंतर मैदानावर गोंधळ उडाला. टीम इंडियाचा English फॅन जार्व्हो फलंदाजीला मैदानावर उतरला. लॉर्ड्स कसोटीत हाच जार्व्हो जर्सी क्रमांक ६९ घालून फिल्डींगला मैदानावर उतरला होता. आता तर तो बॅट, पॅड, हेल्मेट व ग्लोव्हज अशा पूर्ण तयारीतच मैदानावर उतरला. ( Team India's fan Jarvo walked out in his cricketing gear and managed to take guard before the security at Leeds took him off the field) 

अम्पायरच्या चुकीचा टीम इंडियाला मोठा धक्का, बाद नसूनही रोहित शर्माला जावे लागेल माघारी!

जार्व्होनं सुरक्षा रक्षकांना पुन्हा एकदा चकवले अन् मैदानावर आला. त्याला पकडण्यासाठी मग एकच धावपळ झाली.  
पाहा व्हिडीओ...




दुसऱ्या डावात रोहित व लोकेशनं आश्वासक सुरुवात करत काही सुरेख फटके मारले. लोकेशला अम्पायरनं पायचीत बाद दिले होते, पंरतु त्यानं लगेच रिव्ह्यू घेतला आणि त्यामुळे तो वाचला. पण, त्याचा फायदा उचलण्यात तो अपयशी ठरला. लंच ब्रेक होण्यापूर्वीच्या षटकात लोकेश ८ धावांवर माघारी परतला. रोहित व चेतश्वर पुजारा या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी १७३ चेंडूंत ८२ धावांची भागीदारी करून टीम इंडियाचा डाव सावरला. रोहितनं २०२१मधील पाचवे अर्धशतक पूर्ण केले. पण, ४८व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर रोहितसाठी LBWची अपील झाली, मैदानावरील पंचांनी त्याला बाद दिले. याविरोधात हिटमॅननं DRS घेतला. त्यात चेंडू यष्टिंना चुकवून जात असल्याचे दिसत होते. फक्त umpires call मुळे रोहितला बाद ठरवण्यात आले. रोहित १५६ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारांसह ५९ धावांवर माघारी परतला. 

Web Title: India vs England 3rd Test Live Cricket Score : Team India fan Jarvo breaches security again, walks out to bat after Rohit Sharma's dismissal, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.