Ind vs Eng 3rd Test : चर्चा तर होणारच; नरेंद्र मोदी स्टेडियमवर एका बाजूला रिलायन्स एंड, तर दुसऱ्या बाजूला अदानी एंड!

India vs England 3rd Test : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचं औपचारिक उद्धाटन केलं.

By स्वदेश घाणेकर | Published: February 25, 2021 02:16 PM2021-02-25T14:16:33+5:302021-02-25T14:23:05+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 3rd Test : Reliance end, Adani end at Narendra Modi Stadium draw attension | Ind vs Eng 3rd Test : चर्चा तर होणारच; नरेंद्र मोदी स्टेडियमवर एका बाजूला रिलायन्स एंड, तर दुसऱ्या बाजूला अदानी एंड!

Ind vs Eng 3rd Test : चर्चा तर होणारच; नरेंद्र मोदी स्टेडियमवर एका बाजूला रिलायन्स एंड, तर दुसऱ्या बाजूला अदानी एंड!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देमोटेराच्या नवनिर्मित स्टेडियममध्ये खेळाडूंसाठी तब्बल चार ड्रेसिंग रूम आहेत.स्टेडियममध्ये एका वेळी तब्बल १ लाख १० हजार लोक उपस्थित राहू शकतात

India vs England 3rd Test Live Score : नव्यानं तयार करण्यात आलेल्या अहमदाबाद येथील पूर्वीच्या मोटेरा स्टेडियमचं नाव आता नरेंद्र मोदी स्टेडियम असं ठेवण्यात आलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचं औपचारिक उद्धाटन केलं. २४ फेब्रुवारीपासून या स्टेडियमवर भारत-इंग्लंड ( Ind vs Eng Pink Ball Test) डे नाईट कसोटी सामना सुरू झाला. पहिल्या दिवशी भारतानं वर्चस्व गाजवलं. या स्टेडियमचं नाव नरेंद्र मोदी स्टेडियम असं ठेवण्यात आल्यानंतर विरोधकांनी टीका केली. पण, सोशल मीडियावरही एक चर्चा रंगली. नरेंद्र मोदी स्टेडियमवर रिलायन्स एंड ( Reliance End ) व अदानी एंड ( Adani End) अशी नाव पाहून नेटीझन्सही सुसाट सुटले.

अक्षर पटेलचा दणका, त्यात रोहित शर्माचे अर्धशतक; पहिल्या दिवशी पडल्या १३ विकेट्स

अक्षर पटेलनं ( Axar Patel) दिलेल्या दणक्यानंतर इंग्लंडच्या संघाला रोहित शर्मानं ( Rohit Sharma) चोपून काढलं. फिरकी गोलंदाजांना पोषक खेळपट्टीवर तीन जलदगती गोलंदाज खेळवण्याची चूक इंग्लंडला पहिल्याच दिवशी महागात पडल्याचे दिसले. अक्षर पटेल आणि आर अश्विन ( R Ashwin) यांनी इंग्लंडचा पहिला डाव ११२ धावांवर गुंडाळला आणि प्रत्युत्तरात भारतानं पहिल्या दिवसअखेर ३ बाद ९९ धावा केल्या आहेत. रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) अर्धशतकी खेळीनं टीम इंडियाचा डाव सावरला. अक्षर पटेलनं घेतल्या ६ विकेट्स, आर अश्विनला ३ बळी टिपले. 





Web Title: India vs England 3rd Test : Reliance end, Adani end at Narendra Modi Stadium draw attension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.