India vs England 3rd Test : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा ( Virat Kohli) आक्रमकपणा अनेकांना भावतो.. सौरव गांगुलीनंतर भारताचा आक्रमक कर्णधार कोण असेल, तर तो विराट... त्यामुळे मैदानावर प्रतिस्पर्धीही त्याच्याशी पंगा घेण्यापूर्वी अनेकदा विचार करतात. इंग्लंडचा कर्णधार जो रूट ( Joe Root) याला बाद केल्यानंतर विराटनं भन्नाट सेलिब्रेशन केलं. त्यानं ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ब्रेट ली ( Bret Lee) याच्या सेलिब्रेशनची स्टाईल कॉपी केली. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ( Virat Kohli's Brett Lee-esque celebration ) भारतीय क्रिकेटपटूंची राजकीय इनिंग; एकानं जॉईन केलं BJP, तर एक तृणमूल काँग्रेसमध्ये
इंग्लंडचा कर्णधार जो रूट यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय त्यांच्या अंगलट आला. अक्षर पटेलनं ६ विकेट्स घेत इंग्लंडला दणके दिले, तर आर अश्विननं तीन विकेट्स घेतल्या. शंभरावा कसोटी सामना खेळणाऱ्या इशांत शर्मानंही एक विकेट घेतली. इंग्लंडचा पहिला डाव ११२ धावांवर गडगडला. आर अश्विननं जो रूटला पायचीत करताच विराटनं भन्नाट सेलिब्रेशन केलं. बेन स्टोक्सनं असं केलं तरी काय, की विराट कोहलीला अनावर झाला राग; सुनील गावस्करांनी टोचले कान
पाहा व्हिडीओ...
Web Title: India vs England 3rd Test : Virat Kohli's Brett Lee-esque celebration to give Joe Root a fiery send-off in 3rd Test, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.